Apple Siri कडून सेक्स दरम्यान युजर्सचे बोलणे रेकॉर्ड, युजर्सला नाही होते माहित 

फोना-फोनी
Updated Aug 27, 2019 | 18:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

अॅपल सिरीबाबत एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार अॅपल सिरी युजर्सच्या खासगी क्षणावेळी बातचित रेकॉर्ड करत होते. याची युजर्सला माहितीच नव्हती. 

siri
सिरीकडून सेक्स दरम्यानचे संभाषण रेकॉर्ड 

थोडं पण कामाचं

  • सिरी युजर्सच्या सेक्स दरम्यानच्या गोष्टी रेकॉर्ड करत होता
  • या गोष्टी अॅपलचे थर्ड पार्टी वर्कर्स केवळ ऐकत नव्हते तर ते रेकॉर्डही करत होते. 
  • अॅमझॉन इको, गुगल असिस्टंट आणि अॅपल सिरीवर लावण्यात आले गंभीर आरोप 

दिग्गज टेक कंपनी अॅप (APPle) कायम आपल्या युजर्सच्या प्रायव्हसीबाबत नेहमी जागृत असते. अशात एक बातमी सर्वांना धक्का देणारी समोर येत आहे. कंपनीची पॉप्युलर व्हर्चुअल असिस्टंट सिरी युजर्सच्या खासगी आयुष्यातील विशेषतः सेक्स दरम्यान करण्यात येणाऱ्या गोष्टी रेकॉर्ड करत होती. केवळ इतके नाही ही सर्व बातचीत अॅपलच्या थर्ड पार्टी वर्कर्सला ती ऐकू येत होती आणि ते तिला रेकॉर्डही करत होते. 

यापूर्वी अॅमेझॉन इको, गुगल असिस्टंट आणि अॅपलच्या सिरीबाबतही अशा बातम्या आल्या होत्या. या सर्वांवर आरोप लावण्यात आला होता की, हायर करण्यात आलेले थर्ड पार्टी लोग युजर्सच्या पर्सनल गोष्टी ऐकतात आणि त्यांना रेकॉर्ड करतात. या प्रकरणाची अॅपलने  गंभीर दखल घेतली असून कॉन्टॅक्टर्सला नोकरीतून काढून टाकले होते. हे कॉन्ट्रॅक्टर्स एका शिफ्टमध्ये एक हजार रेकॉर्डिंग ऐकत होते. 

कपल्सच्या खासगी आयुष्यातील ऐकत होते बातचीत 

पश्चिम आयर्लंडच्या कॉर्क शहरतात Apple कॉन्ट्रॅक्टर्स युजर्सच्या सेक्सवेळी होणाऱ्या चर्चा ऐकत होते. या शिवाय हे सिरी (siri) संवेदनशील बिझनेस डील किंवा ड्रग्स डिल्सही ऐकत होते. 

चर्चेला केले जात होते रेकॉर्ड 

एका सूत्राने The Guardian या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार जगभऱातील सध्याच्या अॅपलचे कॉन्ट्रॅक्टर्स सिरी युजर्सच्या सर्व पर्सनल गोष्टी एैकतात आणि त्याल रेकॉर्डही करतात. त्यानंतर Apple ने या प्रकरणात गंभीरतेने दखल घेतली. 

युजरची माहिती गोपनीय ठेवत होते

या प्रकरणात एका माजी कर्मचाऱ्याने या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार आम्ही युजर्सची ओळख गोपनीय ठेवत होतो. ये रेकॉर्डिंग्स काही सेकंदाची असायची. कधी कधी आम्ही पर्सनल डेटा किंवा खासगी गोष्टी ऐकत होते. यात जास्त प्रमाण हे सिरीला देण्यात येणाऱ्या कमांड्स असायच्या. 

युजर्सला होत नव्हती भनक 

या प्रकरणात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या गोष्टीची माहिती युजर्सला बिल्कुल नव्हती. युजर्सला माहितीच नव्हते की त्याची सर्व गोष्टी या सिरी असिस्टिंट द्वारे रेकॉर्ड होत आहे. या प्रकरणी कंपनीने गेल्या महिन्यात सिरी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून करण्यात येणारे ट्रान्स्क्रिप्शन आणि ग्रेंडिंगचे काम बंद केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...