BSNL Plan | बीएसएनएल ग्राहकांसाठी भन्नाट प्लॅन, १०७ रुपयांत ८४ दिवसांची व्हॅलिडिटी, इतर असंख्य फायदे

BSNL Top Plan : प्रीपेड प्लॅनबरोबर (Prepaid Plan) बीएसएनए डेटाची सुविधादेखील देते. याचबरोबर जर तुम्ही इंटरनेटच्या स्पीडवर जास्त लक्ष देत नसाल किंवा तशी आवश्यकता नसेल तर बीएसएनएलच्या प्लॅनमधून मिळणारे फायदे इतर कंपन्यांच्या प्लॅनच्या तुलनेत अधिक आहेत. बीएसएनएलचा एक १०७ रुपयांचा एन्ट्री लेव्हल प्रीपेड प्लॅन ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.

BSNL Prepaid Plan
बीएसएनएलचा प्रीपेड प्लॅन 
थोडं पण कामाचं
  • बीएसएनएल प्रीपेड ग्राहकांसाठी जबरदस्त प्लॅन
  • १०७ रुपयांमध्ये मिळतोय भन्नाट प्लॅन
  • प्लॅनवर मिळतेय ८४ दिवसांची व्हॅलिडिटी

BSNL Prepaid Plan | नवी दिल्ली : बीएसएनएल (BSNL)या सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीचे अनेक प्रीपेड प्लॅन बाजारात आहेत. प्रीपेड प्लॅनबरोबर (Prepaid Plan) कंपनी डेटाची सुविधादेखील देते. याचबरोबर जर तुम्ही इंटरनेटच्या स्पीडवर जास्त लक्ष देत नसाल किंवा तशी आवश्यकता नसेल तर बीएसएनएलच्या प्लॅनमधून मिळणारे फायदे इतर कंपन्यांच्या प्लॅनच्या तुलनेत अधिक आहेत. बीएसएनएलचा एक १०७ रुपयांचा एन्ट्री लेव्हल प्रीपेड प्लॅन ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. तर याचबरोबर यामध्ये ६० दिवसांसाठी मोफत बीएसएनल ट्युन्ससोबत १०० मिनिटांचा फ्री व्हॉईस कॉलसोबत ३ जीबी डेटा दिला जातो. बीएसएनएलच्या विविध प्रीपेड प्लॅनबद्दल जाणून घेऊया ज्या कमी किंमतीत जास्त व्हॅलिडिटी मिळते. (Best BSNL prepaid plans with higher validity)

बीएसएनएलचे स्वस्त आणि मस्त प्रीपेड प्लॅन-

बीएसएनलचा २४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन-

बीएसएनएलच्या २४९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. व्हॉइस कॉलिंगसह हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देतो. तर या प्लॅनमध्ये १०० एसएमएस मिळतात. २ जीबी डेली डाटा लिमिट पूर्ण झाल्यावर इंटरनेटचा स्पीड ४० केबीपीएसपर्यत कमी होतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी ६० दिवसांची आहे. अर्थात युजर्सने लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे एक फर्स्ट रिचार्ज कूपन आहे जे फक्त नव्या ग्राहकांसाठीच आहे.

बीएसएनलचा २४७ चा प्रीपेड प्लॅन-

यामध्ये ५० जीबी डेटा मिळतो. यात ३० दिवसांची व्हॅलिडिटी असते. व्हॉइस कॉलिंगसह हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देतो. तर या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात. २ जीबी डेली डाटा लिमिट पूर्ण झाल्यावर इंटरनेटचा स्पीड ८० केबीपीएसपर्यत कमी होतो. 

बीएसएनलचा २९८ चा प्रीपेड प्लॅन-

यामध्ये १ जीबी डेटा मिळतो. यात ५६ दिवसांची व्हॅलिडिटी असते. व्हॉइस कॉलिंगसह हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देतो. तर या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात.

बीएसएनलचा ३१९ चा प्रीपेड प्लॅन-

यात ७५ दिवसांची व्हॅलिडिटी असते. व्हॉइस कॉलिंगसह हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देतो.

बीएसएनलचा ३९७ चा प्रीपेड प्लॅन-

यामध्ये २ जीबी डेटा मिळतो. यात ३०० दिवसांची व्हॅलिडिटी असते. व्हॉइस कॉलिंगसह हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देतो. तर या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात.

बीएसएनलचा ३९९ चा प्रीपेड प्लॅन-

यामध्ये १ जीबी डेटा मिळतो. यात ८० दिवसांची व्हॅलिडिटी असते. व्हॉइस कॉलिंगसह हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देतो. तर या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात.

बीएसएनलचा ४८५ चा प्रीपेड प्लॅन-

यामध्ये १.५ जीबी डेटा मिळतो. यात ९० दिवसांची व्हॅलिडिटी असते. व्हॉइस कॉलिंगसह हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देतो. तर या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात.

दूरसंचार कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन बाजारात आणत असतात.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी