Best Prepaid Plans | या २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये आहे ग्राहकांचा फायदाच फायदा

Mobile Prepaid Plans | एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea)आपल्या शुल्कात वाढ केली होती. त्यानंतर जिओनेदेखील (Jio)आपल्या शुल्कात वाढ केली आहे. एअरटेल आणि व्होडाफोनने शुल्कात २५ टक्के तर जिओने २० टक्के वाढ केली आहे. २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे कोणते चांगले प्रीपेड प्लॅन्स (Best prepaid plan) सध्या उपलब्ध आहेत ते पाहूया.

Mobile Prepaid Plans below Rs 250
२५० रुपयांखालील प्रीपेड प्लॅन 
थोडं पण कामाचं
  • दूरसंचार कंपन्यांकडून प्रीपेड प्लॅनच्या शुल्कात वाढ
  • एअरटेल , व्होडाफोन आयडिया आणि जिओचे जबरदस्त प्लॅन
  • २५० रुपयांखालील प्रीपेड प्लॅन

Mobile Prepaid Plans | नवी दिल्ली : देशातील दूरसंचार क्षेत्रातील खासगी कंपन्यांनी प्रीपेड प्लॅनच्या (Prepaid Plan tariff) शुल्कात वाढ केली आहे. याआधी एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea)आपल्या शुल्कात वाढ केली होती. त्यानंतर जिओनेदेखील (Jio)आपल्या शुल्कात वाढ केली आहे. एअरटेल आणि व्होडाफोनने शुल्कात २५ टक्के तर जिओने २० टक्के वाढ केली आहे. २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे कोणते चांगले प्रीपेड प्लॅन्स (Best prepaid plan) सध्या उपलब्ध आहेत ते पाहूया. (Best prepaid plans below Rs 250 by Airtel, Jio & Vodafone Idea)

रिलायन्स जिओचा १४९ रुपयांचा प्लॅन-

या प्लॅनमध्ये १ जीबी डेटा दररोज मिळतो. शिवाय अनलिमिटेड कॉलिंग मिळते, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. हा प्लॅन २० दिवसांचा आहे. या प्लॅनमध्ये जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओसिक्युरिटी आणि जिओक्लाउड या सुविधांचा समावेश आहे.

जिओचा १७९ रुपयांचा प्लॅन-

या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा दररोज मिळतो. शिवाय अनलिमिटेड कॉलिंग मिळते, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. हा प्लॅन २४ दिवसांचा आहे. या प्लॅनमध्ये जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओसिक्युरिटी आणि जिओक्लाउड या सुविधांचा समावेश आहे.

जिओचा २०९ रुपयांचा प्लॅन-

या प्लॅनमध्ये  १ जीबी डेटा दररोज मिळतो. शिवाय अनलिमिटेड कॉलिंग मिळते, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. हा प्लॅन २८ दिवसांचा आहे. या प्लॅनमध्ये जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओसिक्युरिटी आणि जिओक्लाउड या सुविधांचा समावेश आहे.

व्होडाफोन आयडियाचा १२९ रुपयांचा प्लॅन-

या प्लॅनमध्ये एकूण २०० एमबी डेटा मिळतो. शिवाय अनलिमिटेड कॉलिंग मिळते. हा प्लॅन १८ दिवसांचा आहे. 

व्होडाफोन आयडियाचा १४९ रुपयांचा प्लॅन-

या प्लॅनमध्ये एकूण १जीबी डेटा मिळतो. शिवाय अनलिमिटेड कॉलिंग मिळते. हा प्लॅन २१ दिवसांचा आहे. 

एअरटेलचा १५५ रुपयांचा प्लॅन-

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतात. हा प्लॅन २४ दिवसांचा आहे. यात हॅलो ट्युन्स आणि विन्क म्युझिकची सुविधा मिळते.

एअरटेला १७९ रुपयांचा प्लॅन-

या प्लॅनचा कालावधी २८ दिवसांचा आहे. यात एकूण २ जीबी डेटा मिळतो. शिवाय हॅलो ट्युन्स आणि विन्क म्युझिकची सुविधा मिळते.

अलीकडेच एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या दोन दूरसंचार कंपन्यांनी आपल्या प्लॅनच्या किंमतीत बदल करत त्यांचे शुल्क वाढवले होते. त्यानंतर रिलायन्स जिओनेदेखील आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले होते. आता मात्र असे दिसून येते आहे की जिओने आपल्या ४,९९ रुपये, ६६६ रुपये, ८८८ रुपये, २,४९९ रुपये आणि ५४९ रुपयावाल्या प्लॅनना बंद केले आहे. कारण सध्या हे प्लॅन रिलायन्स जिओच्या वेबसाईटवर दिसत नाहीत. लायन्स जिओ या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीने आपले काही प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत. ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. जिओने सप्टेंबर महिन्यातच Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनसोबत पाच नवे प्रीपेड प्लॅन बाजारात आणले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी