अवघ्या ६८ रूपयांमध्ये मिळेल दररोज १.५ जीबी डेटा, पाहा कोणती कंपनी देतेय ही ऑफर

फोना-फोनी
Updated May 03, 2021 | 15:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

सध्या लॉकडाऊनमुळे नेटचा वापर वाढला आहे.त्यातच बीएसएनएलने नवी ऑफर आणली आहे. यात तुम्हाला दिवसाला १.५ जीबी डाटा मिळतो. 

smartphone
अवघ्या ६८ रूपयांमध्ये मिळेल दररोज १.५ जीबी डेटा 

थोडं पण कामाचं

  • बीएसएनएलच्या ६८ रूपयांच्या प्लानमध्ये मिळणार एकूण २१ जीबी डेटा
  • बीएसएनएलच्या या प२कमध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध नाही
  • प्लानची व्हॅलिडिटी १४ दिवसांची आहे

मुंबई: भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) यूज़र्ससाठी १०० रूपयांपेक्षा कामी किंमतीत अनेक रिचार्ज प्लान आणले आहेत. याचे फायदेही एकापेक्षा एक आहेत. जर तुम्हीही बीएसएनएल युजर आहात आणि १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीतील रिचार्ज प्लान शोधत आहात तर बीएसएनलचा हा प्लान तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. याची किंमत केवळ १०० रूपये नाही तर ७० रूपयांहूनही कमी आहे. 

BSNL च्या या रिचार्ज प्लानची किंमत केवळ ६८ रूपये आहे. ६८ रूपयांचा हा रिचार्ज प्लान तुम्हाला डेली डाटा फायदा देतो. होय, खरंच ऐकलंय तुम्ही. बीएसएनएलच्या या ६८ रूपयांच्या पॅकमध्ये तुम्हाला दररोज दिवसाला १.५ जीबी डाटा वापरण्याची सोय आहे. या प्लानची व्हॅलिडिटी १४ दिवसांचीच आहे. या पद्धतीने पाहता ६८ रूपयांच्या या पॅकमध्ये तुम्हाला १४ दिवसांसाठी २१ जीबी डेटा मिळतो. हा पॅक विद्यार्थी आणि फ्रीलान्सिंग करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. डाटा व्यतिरिक्त बीएसएनलच्या या पॅकमध्ये इतर कोणतेही फायदे नाहीत. 

बीएसएनल व्यतिरिक्त इतर कोणतीही टेलिकॉम कंपनी अशा प्रकारचा रिचार्ज पॅक आणत नाही. याबाबतच्या पॅकबाबत बोलायचे झाल्यास तर Vi कंपनी १४८ रूपयांच्या पॅकमध्ये दिवसाला १ जीबी डेटा देते. याची व्हॅलिडिटी १८ दिवसांची आहे. 

रिलायन्स जिओचा ५९८ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा ५९८ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी फक्त ५६ दिवसांची आहे. ग्राहकांना यामध्ये दररोज २ जीबी हाय स्पीड ४जी डेटा, अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉलिंग आणि १०० एसएमएसचा लाभ मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. कंपनी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Jio Apps ची मेंबरशीप आणि १ वर्षासाठी Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देते.

भारतातील दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे, अशात जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दूरसंचार कंपन्या विविध ऑफर्स देत आहेत. देशाच्या दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीन आघाडीच्या कंपन्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी