BSNL चा जबरदस्त प्लान, प्रत्येक कॉलवर ग्राहकांना होणार फायदा

BSNL New Offer: बीएसएनएलनं आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त प्लान सादर केला आहे. बीएसएनएल कंपनी या प्लानमध्ये ग्राहकांना कॉल केल्यास पैसे देईल. 

BSNL
BSNL चा जबरदस्त प्लान, प्रत्येक कॉलवर ग्राहकांना होणार फायदा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • बीएसएनएल (BSNL) नं जिओ (jio) आणि अन्य टेलीकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नव्या पद्धतीचा प्लान सादर केला आहे.
  • कंपनी आपल्या ग्राहकांना 5 मिनिटांच्या वॉईस कॉलिंगवर 6 पैसे देत आहे.
  • बीएसएनएल ( BSNL New Plan) आपल्या वायरलाइन, ब्रॉडबँड आणि एफटीटीएच ग्राहकांना 6 पैसे प्रति 5 मिनिटांच्या हिशोबानं कॅशबॅक देत आहे.

मुंबईः  बीएसएनएल (BSNL) नं जिओ (jio) आणि अन्य टेलीकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नव्या पद्धतीचा प्लान सादर केला आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना 5 मिनिटांच्या वॉईस कॉलिंगवर 6 पैसे देत आहे. जिथे जिओ प्रत्येक मिनिटच्या संवादा  (दुसऱ्या नेटवर्कवर) साठी ग्राहकांकडून 6 पैसे चार्ज घेत आहेत. तर बीएसएनएल (BSNL) आपल्या ग्राहकांना पैसे देत आहेत. 

BSNL New Plan

रिपोर्ट्सनुसार बीएसएनएल ( BSNL New Plan) आपल्या वायरलाइन, ब्रॉडबँड आणि एफटीटीएच ग्राहकांना 6 पैसे प्रति 5 मिनिटांच्या हिशोबानं कॅशबॅक देत आहे. संकटांत अडकलेल्या कंपनीला बाहेर काढण्यासाठी हा एक चांगलं पाऊल आहे. हल्लीच सरकारनं बीएसएनएलच्या रिवाइवलसाठी एक मदतीची घोषणा केली आहे. 

2016 मध्ये जिओनं टेलीकॉम सेक्टरमध्ये एन्ट्री केल्यानंतर पूर्ण सेक्टरमध्ये एक मोठा बदल बघायला मिळाला होता. आता बीएसएनएलच्या या निर्णयानंतर ग्राहकांना एक मोठा बदल बघायला मिळू शकतो. बीएसएनएलनं जिओ आणि अन्य कंपन्यांपासून पुढे जात एक मोठा डाव खेळला आहे. जो सर्व टेलीकॉम कंपन्यावर भारी पडण्याची शक्यता आहे. 

ग्राहकांना बीएसएनएल काय लाभ देणार 

BSNLच्या ग्राहकांना 5 मिनिटं बोलल्यास 6 पैसे कॅशबॅक मिळेल. ही सुविधा बीएसएनएलच्या वायरलाइन, ब्रॉडबॅंड आणि एफटीटीएच ग्राहकांना मिळेल. बीएसएनएलच्या सीएफए  संचालक, विवेक बंजल यांनी सांगितलं की, डिजीटल युगात जिथे ग्राहक चांगल्या क्वॉलिटीची सेवा इच्छित आहेत. तिथे आम्हांला असं वाटतं की, ग्राहकांनी एक पिढी पुढील नेटवर्कचा लाभ घ्यावा आणि त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देखील मिळू. 

BSNL Rs 108 FRC

याव्यतिरिक्त बीएसएनएल सतत नवनवीन प्लानच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याचं काम करत आहे. काही दिवसांपूर्वीच बीएसएनएलनं 108 रूपयांचा फर्स्ट रिचार्ज प्लान सादर केला. जो ग्राहकांना 180 दिवसांसाठी वैध असेल आणि 28 दिवसांसाठी फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचा लाभ देत आहे. आणखी या व्यतिरिक्त बीएसएनएलनं काही आकर्षक प्लान देखील सादर केलेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी