बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी खुष खबर- फक्त ४७ रुपयांचा बंपर प्लॅन, बोला अनलिमिटेड

फोना-फोनी
Updated Apr 12, 2021 | 20:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

BSNL prepaid plan- बीएसएनएलच्या (BSNL)नव्या प्लॅनमुळे रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

BSNL new prepaid plan, Rs. 47, free calling
बीएसएनएलचा नवा ४७ रुपयांचा प्रीपेड प्लॅन 

थोडं पण कामाचं

  • बीएसएनएलचा ४७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
  • ग्राहकांना चोवीस तास फ्री कॉलिंगची सुविधा
  • रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासमोर आव्हान

नवी दिल्ली : बीएसएनएलच्या (BSNL) ग्राहकांसाठी खुष खबर आहे. बीएसएनएलने एक बंपर प्लॅन आणला आहे. बीएसएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीने सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन (BSNL Prepaid plan)आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे. हा बंपर प्लॅन खासगी क्षेत्रातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांना टक्कर देतो आहे. बीएसएनएलच्या ४७ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना चोवीस तास फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमुळे रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या खासगी क्षेत्रातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांसमोर आव्हान निर्माण केले आहे. या कंपन्यांदेखील आपल्या टेरिफ प्लॅनमध्ये बदल करावे लागू शकतात. आपल्या विविध प्लॅनना कंपन्या सतत बदलत असतात. विशेषत: छोटे रिचार्ज प्लॅन जास्त लोकप्रिय असतात.

४७ रुपयांत बोला अनलिमिटेड


बीएसएनएल व्यतिरिक्त रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन बाजारात आणले आहेत. मात्र बीएसएनएलचा ४७ रुपयांचा प्रीपेड प्लॅनची सध्या चर्चा सुरू आहे. २४ तास मोफत कॉलिंगच्या सुविधेने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये रोज १ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएसची सुविधादेखील मिळते आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे.

रिलायन्स जिओचे स्वस्त प्लॅन


बीएसएनएलच्या तुलनेत रिलायन्स जिओ (Reliance Jio)चे प्लॅन जास्त स्वस्त आहेत. मात्र या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त टॉप-अपची सुविधा मिळते. प्लॅनसाठी व्हॅलिडिटी लागू होत नाही. जिओने ५१ रुपये आणि २१ रुपयांचे प्लॅन ग्राहकांसाठी बाजारात आणले आहेत.

एअरटेलचे स्वस्त प्लॅन


एअरटेलचे (Airtel)१०० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले दोन प्रीपेड प्लॅन सध्या बाजारात आहेत. पहिला ४९ रुपयांचा आहे तर दुसरा प्लॅन ७९ रुपयांचा आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त २०० एमबीचा डेटा मिळतो आहे.

व्होडाफोन आयडियाचे स्वस्त प्लॅन


व्होडाफोन-आयडिया (Vi)चे देखील दोन प्लॅन बाजारात आहेत. ४८ रुपये आणि ९८ रुपये असे दोन प्लॅन सध्या बाजारात आहेत. यामध्ये लिमिडेट डेटा आणि फ्रि सर्व्हिसेस देण्यात आल्या आहेत.

दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा

सध्या देशातील दूरसंचार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. खासगी क्षेत्रातील रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएल या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे घेचून घेण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. त्यासाठी या कंपन्या बाजारात नवनवीन प्लॅन आणत असतात. त्यातही जिओ आणि एअरटेल या कंपन्या आघाडीवर आहेत. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या देशातील महत्त्वाच्या दूरसंचार कंपन्या आहेत. मागील काही वर्षात जिओने देशातील दूरसंचार क्षेत्रात प्रचंड मुसंडी मारली असून इतर कंपन्यांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओमध्ये तर मागील वर्षभरात अनेक आंतरराष्टीय कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली असून आगामी काळात जिओचा मोठा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. जिओचा वापर करत रिलायन्स समूह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपला विस्तार करू पाहतोय. त्यामुळेच जिओच्या भविष्यातील योजनांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी