धमाकेदार प्लान: 1198 रुपयांत वर्षभराची वॅलिडिटी, प्रत्येक महिन्याला 3 GB डेटा आणि बरंच काही

Mobile recharge plan: बीएसएनएलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी दोन प्रीपेड प्लान्स लॉन्च केले आहेत. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

BSNL Prepaid Plan: भारत संचार निगम लिमिटेडने फेस्टिवल सिझनमध्ये आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी टेरिफ ऑफर्स लॉन्च केले आहेत. हे प्रीपेड प्लान्स देशभरातील सर्व प्रीपेड ग्राहकांसाठी लागू करण्यात आले आहेत. यामध्ये विविध फायदे ग्राहकांना मिळणार आहेत. BSNL ने Diwali Offer 2022 अंतर्गत 1198 रुपये आणि 439 रुपये असे दोन टेरिफ प्लान लॉन्च करण्यात आले आहेत. (bsnl offers 1198 rupees plan with 3gb data unlimited calls and much more read details in marathi)

BSNL चा 1198 रुपयांचा प्लान

बीएसएनएलने 1198 रुपयांचा दिवाळी ऑफर अंतर्गत प्रीपेड ग्राहकांसाठी प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये युजर्सला 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. या काळात ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 3GB डेटा, 300 मिनिट्स कॉलिंग आणि 30 SMS मिळणार आहेत. या सुविधा महिन्याच्या शेवटी एक्सपायर होतील आणि पुढील महिन्यात कॅरी फॉरवर्ड होणार नाहीत.

हे पण वाचा : 12 राशींपैकी सर्वाधिक धोकादायक रास कोणती? वाचा

BSNL चा 439 रुपयांचा प्लान

बीएसएनएलने लॉन्च केलेल्या 439 रुपयांच्या प्लानची वॅलिडिटी 90 दिवसांची म्हणजेच 3 महिन्यांची आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि पूर्ण वॅलिडिटीसह 300 SMS मिळणार आहेत. या प्लानमध्ये डेटा बेनिफिट्सचा समावेश नाहीये. हा प्लान अशा ग्राहकांसाठी चांगला आहे जे जास्त प्रमाणात कॉल्स करतात.

हे पण वाचा : या दोन राशींचे जोडपे असते सर्वात Cute

या दोन्ही प्लान्सच्या सोबतच बीएसएनएलने दोन एन्टरटेन्मेंट आणि गेमिंग वाऊचर लॉन्च केले आहेत. बीएसएनएलच्या 269 रुपयांच्या वाऊचरमध्ये ग्राहकांना 30 दिवसांची वॅलिडिटी, दररोज 2GB डेटा, दररोज 100 SMS, अनलिमिटेड चेंज ऑप्शनसह बीएसएनएल ट्यून्स, Challenges arena गेम्स आणि एंटरटेन्मेंट बेनिफिट्स मिळतील. तर 769 रुपयांच्या प्लानचं बोलायचं झालं तर यामध्ये ग्राहकांना सर्व बेनिफिट्स 269 रुपयांच्या प्लान प्रमाणेच मिळतात मात्र, या प्लानची वॅलिडिटी 90 दिवसांची असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी