बीएसएनएलच्या प्लॅन मिळतोय ९,९९९ रुपयांचा गुगल स्मार्ट स्पीकर, लगेच घ्या फायदा

फोना-फोनी
Updated Apr 19, 2021 | 18:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

बीएसएनएलच्या (BSNL)ऑनलाईन पोर्टलवर ग्राहक हे सबस्किप्शन घेऊ शकतात. या प्लॅनसाठी त्यांना ३ महिने, ६ महिने आणि वर्षभराचे सबस्क्रिप्शन शुल्क अॅडव्हान्स द्यावे लागणार आहे.

BSNL offers Google Smart Speaker for customers through this plans
बीएसएनएलची गुगल स्मार्ट स्पीकरची ऑफर, असा घ्या फायदा 

थोडं पण कामाचं

  • बीएसएनएलची नवीन ऑफर
  • मिळवा गुगल स्मार्ट स्पीकर
  • ग्राहकांसाठी आणले नवीन प्लॅन

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लि.ने म्हणजे 'बीएसएनएल'ने (BSNL)पुन्हा एकदा गुगल ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरद्वारे बीएसएनएल भारत फायबर ग्राहकांना गुगल नेस्ट आणि गुगल मिनी स्पीकर डिस्काउंटच्या दरात मिळणार आहे. ही ऑफर ९० दिवसांसाठीच आहे. या ऑफरची अंतिम मुदत १४ जुलै २०२१ ही आहे. या ऑफरमध्ये ७९९ रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचेच ब्रॉडबॅंड प्लॅन घ्यावे लागणार आहेत. डिस्काउंट ऑफर अंतर्गत ग्राहकांना नेस्ट मिनी किंवा गुगल नेस्ट हब स्मार्ट डिव्हाईस फक्त ९९ रुपये आणि १९९ रुपये प्रति महिन्याच्या रिचार्जवर मिळणार आहे. मात्र त्यासाठी ग्राहकांना या प्लॅनचे सर्व शुल्क सुरूवातीलाच भरावे लागेल.

असे आहेत प्लॅन

ग्राहकांना बीएसएनएलच्या ऑनलाईन पोर्टलच्या मदतीने हे बंडल सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. त्यासाठी ३ महिने, ६ महिने किंवा वर्षभरासाठीचे शुल्क अॅडव्हान्स द्यावे लागणार आहे. जर एखाद्या ग्राहकाला हा प्लॅन घ्यायचा असेल तर त्याला १०.५ महिने, २०.५ महिने आणि ३०.५ महिन्यांचे पेमेंट करावे लागणार आहे.

गुगल नेस्ट मिनी डिव्हाईस घेताना द्यावे लागेल इतके शुल्क


जर तुम्ही गुगल नेस्ट मिनी घेतले तर तुम्हाला ४,९९९ रुपये भरावे लागतील. मात्र जर तुम्ही बीएसएनएल फायबर ब्रॉडबॅंड प्लॅन्स घेतले तर तुम्हाला यासाठी १,२८७ रुपये मोजावे लागतील. तुमचा प्लॅन १३ महिन्यांचा असेल आणि दर महिन्याला तुम्हाला ९९ रुपये द्यावे लागतील. तर एखाद्या ग्राहकाने १२ महिन्यांचा प्लॅन घेतला नेस्ट मिनीची किंमत १,१८८ रुपये इतकी असणार आहे.

गुगल नेस्ट हबसाठी हे आहेत प्लॅन


गुगल नेस्ट हबसाठी ग्राहकांना दरमहिन्यास फिक्स्ड चार्ज द्यावा लागेल. तो १,९९९ रुपये इतका किंवा त्याहून अधिक असेल. हे शुल्क १०.५ महिने, २०.५ महिने आणि ३०.५ महिन्यांसाठी द्यावे लागणार आहे. अॅन्युअल, बायनियल आणि ट्रायनियलवर वन टाईम चार्ज द्यावा लागेल. गुगल नेस्ट हब स्वतंत्रपणे घेण्यासाठी ९,९९९ रुपये मोजावे लागतील. मात्र बीएसएनएल ब्रॉडबॅंड प्लान्ससोबत नेस्ट हबची किंमत २,५८७ रुपये इतकी असेल. यासाठी ग्राहकांना १३ महिन्यांचा ७९९ रुपयांचा किंवा अधिकचा प्लॅन घ्यावा लागेल. जर ग्राहकाने १२ महिन्यांसाठी ब्रॉडबॅंडचा प्लॅन घेतला तर दर महिन्याला १९९ रुपये भरावे लागतील आणि नेस्ट हबची किंमत २,३८८ रुपये इतकी असेल.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांनी दूरसंचार क्षेत्रात तगडे आव्हान निर्माण केले आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि अधिकाधिक ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी बीएसएनएलदेखील नवनवीन ऑफर बाजारात आणते आहे. मागील काही दिवसात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोननेसुद्धा ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणि प्लॅन बाजारात आणले आहेत. यामुळे ग्राहकांना मात्र विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. आगामी काळात टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी