BSNLचा जबरदस्त प्लान, मिळणार 547.5 GB डेटा

फोना-फोनी
Updated Jun 27, 2019 | 12:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

BSNL Recharge: बीएसएनएलने आपला नवा प्लान लॉन्च केला आहे ज्यामध्ये युजर्सला जास्त डेटा आणि वैधता मिळणार आहे. बीएसएनएलच्या या प्लानची वैधता एका वर्षाची असणार आहे.

bsnl recharge plan get 1.5gb data
BSNLचा जबरदस्त प्लान, मिळणार 547.5 GB डेटा  

नवी दिल्ली: भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे. बीएसएनएलला भले ही वाईट स्थितीचा सामना करावा लागत असेल मात्र, कंपनी वारंवार एसटीव्ही आणि ब्रॉडबँड प्लान लॉन्च करत आहे. टेलिकॉम सेक्टरमध्ये आपली जागा भक्कम करण्यासाठी कंपनीने आणखीन एक पाऊल टाकलं आहे. गेल्या काही दिवसांत बीएसएनएलने नव्या ऑफर आणि नवे प्लान लॉन्च केले आहेत मात्र आता कंपनीने आला एक जबदस्त प्लान लॉन्च केला आहे. पाहूयात काय आहे हा प्लान...

नव्या प्लानची ऑफर आणि वैधता

बीएसएनएलच्या 1345 रुपयांचा प्लान लॉन्ग टर्मसह उपलब्ध आहे. या प्लानमध्ये युजर्सला एका वर्षाची वैधता मिळत आहे. बीएसएनएलच्या या प्लानध्ये युजर्सला प्रत्येक दिवसासाठी 1.5GB डेटा मिळणार आहे आणि हा डेटा वर्षभर म्हणजेच 365 दिवस मिळणार आहे. हा डेटा एसटीव्ही आहे त्यामुळे यामध्ये कॉलिंग किंवा एसएमएसचा लाभ ग्राहकांना मिळणार नाहीये. या प्लानमध्ये ग्राहकांना प्रति दिवस डेटा मिळणार आहे.

बीएसएनएलचा हा टेरिफ प्लान 9 सप्टेंबर 2019 पर्यंतच उपलब्ध असणार आहे आणि ही एक प्रमोशनल ऑफर आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, हा प्लान सध्या केरळ सर्कलमध्ये लॉन्च केला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने सुपरस्टार 300 ब्रॉडबॅंड प्लान लॉन्च केला आहे ज्यामध्ये ग्राहकांना फ्री हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळतो.

बीएसएनएलचे नवे प्लान्स

BSNLच्या नव्या प्लानचं नाव सुपरस्टार 300 आहे मात्र, या प्लानची किंमत 300 रुपये नाही तर 749 रुपये इतकी आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 300GB डेटा प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. हा डेटा 50 MBPS या स्पीडने मिळणार आहे. यासोबतच बीएसएनएलने अभिनंदन 151 प्लानही लॉन्च केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 100 एसएमएस दररोज मिळतात. बीएसएनएलच्या या प्लानची वैधता 180 दिवसांची आहे. मात्र, ही सुविधा केवळ 24 दिवसच मिळते.

जिओ इफेक्ट

रिलायन्स जिओ बाजारात येताच त्याचा फटका टेलिकॉम सेक्टरमधील सर्वच कंपन्यांना बसला. रिलायन्स जिओने बाजारात येताच स्वस्त आणि मस्त प्लान लॉन्च केले त्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांनी जिओला पसंती दर्शवली. परिणामी इतर कंपन्यांना त्याचा फटका बसला. अखेर रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्यांनी देखील आपले स्वस्त प्लान बाजारात लॉन्च करण्यास सुरूवात केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
BSNLचा जबरदस्त प्लान, मिळणार 547.5 GB डेटा Description: BSNL Recharge: बीएसएनएलने आपला नवा प्लान लॉन्च केला आहे ज्यामध्ये युजर्सला जास्त डेटा आणि वैधता मिळणार आहे. बीएसएनएलच्या या प्लानची वैधता एका वर्षाची असणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola