BSNL चा नवा प्री-पेड प्लान, रोज मिळणार 'ही' सुविधा

बीएसएनलच्या ग्राहकांना 186 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसांसाठी 100 एसएमएस, 250 मिनिटं कॉलिंग आणि 3 जीबी डेटा प्रतिदिन मिळेल. BSNL नं या नवीन प्लानसोबत आपला 998 आणि 1999 रुपयांच्या प्लानमध्ये ही बदल केलेत. 

BSNL
BSNL चा नवा प्री-पेड प्लान, रोज मिळणार 'ही' सुविधा 

मुंबईः  भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनल) नं आपला नवीन प्री-पेड STV 247 प्लान सादर केला आहे.बीएसएनलचा हा नवा प्लान 247 रुपयांचा आहे.
या प्लान अंतर्गत फोन रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना 30 दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंगसोबत 3 जीबी डेटा दररोज मिळेल. दरम्यान, हा नवा प्लान 186/187 रुपयांच्या रिचार्जवर मिळणाऱ्या लाभासारखाच आहे. मात्र या नव्या प्लानमध्ये दोन दिवसांची अतिरिक्त मुदत मिळत आहे. 

186 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना 28 दिवसांपर्यंत 100 एसएमएस, 250 मिनिटांचं कॉलिंग आणि 3 जीबी डेटा प्रतिदिन मिळत आहे. बीएसएनलनं या नव्या प्लानसोबत आपला 998 आणि 1999 रुपयांच्या प्लानमध्येही बदल केलेत. 998 रुपयांचा प्री-पेड रिचार्ज आता 270 दिवसांसाठी असेल. तर 1999 रुपयांच्या प्लानमध्ये दोन महिन्यांपर्यत इरोस नॉउचा कंटेंट बघायला मिळेल. 

मोबाइल प्री-पेडच्या क्षेत्रात जिओकडून मिळणाऱ्या प्रतिस्पर्धेच्या उत्तरात बीएसएनल सुद्धा आपल्या प्री-पेड प्लानमध्ये बदल करत आहे. मोबाइल सेवेच्या क्षेत्रात जिओनं क्रांतिकारी प्लान सादर केलेत. जिओनं अन्य मोबाइल सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना जोरदार टक्कर दिली आहे. जिओच्या प्री-पेड प्लानचा सामना करण्यासाठी अन्य मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांसाठी आकर्षक प्लान सादर केलेत. 

याआधी बीएसएनलनं आपल्या ग्राहकांसाठी 551 रुपयांचा प्रीपेड रिचार्जचा प्लान केला आहे. काही वेळापूर्वी व्होडाफोन आयडियानं आपल्या फॅन्सना होळीच्या आधी दुप्पट डेटा देणारा प्लान जारी केला होता. कंपनीनं 249 रुपये, 399 रुपये आणि 599 रुपये असलेल्या रिचार्ज प्लान्सवर 3GB डेटा दररोज देण्याचा निर्णय घेतला होता आणि आता BSNL सुद्धा अधिक डेटा देण्याच्या तयारीत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी