अवघे 299 रुपये भरा आणि खरेदी करा स्मार्टफोन; itel आणि Bajaj Finservची ऑफर

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण itel कंपनीने अशी ऑफर उपलब्ध केली आहे ज्यानुसार तुम्ही अवघ्या 299 रुपयांत स्मार्टफोन खरेदी करु शकणार आहात.

buy itel smartphone at rs 299 only offer with bajaj finserv
अवघे 299 रुपये भरा आणि खरेदी करा स्मार्टफोन; itel आणि Bajaj Finserv ची ऑफर 

नवी दिल्ली : आयटेल (itel) ब्रँडने बजाज फिनसर्व्ह सोबत एक करार करत मोठी घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना अवघ्या 299 रुपयांत स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. या योजने अंतर्गत आयटेल आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन A48, A25 Pro,Vision 1 (3GB) आणि Vision 1 PRO स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. हे सर्व स्मार्टफोन 4G LTE फीचर्स युक्त आहेत. हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी झिरो डाऊनपेमेंट तसेच नो-कॉस्ट ईएमआय या ऑफर्स सुद्धा उपलब्ध आहेत.

अवघ्या 299 रुपयांत तुम्ही स्मार्टफोन खरेदी करु शकता आणि उर्वरित रक्कम ही ईएमआयच्या माध्यमातून भरता येणार आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना अवघ्या अत्यल्प दरात स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. ज्यांना फीचर फोन सोडून नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

ही योजना बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्क कार्डच्या विद्यमान ग्राहकांना लाग आहे. भारतातील 26 राज्यांतील 1200 हून अधिक शहरांतील बजाज फिनसर्व्ह डीलर्सकडे विद्यमान ग्राहकांसाठी ही योजना लागू आहे. डबल झिरो स्कीम अंतर्गत आयटेल A25 Pro, आयटेल A48, Vision 1 (3GB) आणि Vision 1 PRO यापैकी कुठलाही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी अवघे 299 रुपये आणि प्रोसेसिंग फी भरावी लागेल. त्यानंतर उर्वरित रक्कम ग्राहकांना चार ईएमआयच्या माध्यमातून भरावी लागेल. 1275 रुपये, 1525 रुपये, 1750 रुपये आणि 1725 रुपये.

नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत आयटेल A48, Vision 1 (3GB) आणि Vision 1 PRO यापैकी कुठलाही स्मार्टफोन 299 रुपये आणि प्रोसेसिंग फी देऊन 1220 रुपये, 1380 रुपये आणि 1400 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर उपलब्ध आहेत. 

या योजनेशिवाय बजाज ईएमआय आणि मोबिक्विक वॉलेटसह आकर्षक कॅशबॅक ऑफर, आकर्षक सूट आणि कूपन डील्स सुद्धा उपलब्ध असणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी