Jio, Airtel आणि Vi (Vodafone Idea) चे अनेक प्लॅनसह Netflix सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. Jio मधे हे OTT प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन फक्त पोस्टपेड यूजर्संना दिले जाते. विशेष बाब म्हणजे Jio च्या पोस्टपेड प्लॅन्समध्ये Netflix सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त, Disney + Hotstar आणि Amazon Prime सारख्या इतर OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.
चला जाणून घेऊया प्लॅन्सबाबत:
३९९ रुपयांचा प्लॅन:
जिओच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना ७५ GB डेटा दिला जातो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, ग्राहकांकडून प्रति जीबी १० रुपये आकारले जातात. यासोबतच २०० GB पर्यंत डेटा रोलओव्हर, अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज १०० SMS आणि Jio अॅप्सवर मोफत प्रवेश दिला जातो. या सर्वांशिवाय या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन देखील दिले आहेत.
४९९ रुपयांचा प्लॅन:
या प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० GB डेटा, २०० GB डेटा रोलओव्हर, १ अतिरिक्त सिम कार्ड, अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज १०० SMS आणि Jio अॅप्सचा अॅक्सेस दिला जातो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, ग्राहकांना १ GB साठी १० रुपये आकारले जातात. या सर्वांशिवाय या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन देखील दिले आहेत.
अधिक वाचा: ह्युंडाई क्रेटा आणि टाटा पंच यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी येत आहेत ही २ ढासू गाड्या...
७९९ रुपयांचा प्लॅन:
या प्लॅनमध्ये, ग्राहकांना १५० GB डेटा, २०० GB पर्यंत डेटा रोलओव्हर, २ अतिरिक्त सिम, अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज १०० SMS, Jio अॅप्समध्ये प्रवेश आणि Netflix, Disney + Hotstar आणि Amazon Prime ची मोफत सदस्यता दिली जाते. डेटा मर्यादा संपल्यानंतर, ग्राहकांना १ GB साठी १० रुपये आकारले जातील.
९९९ रुपयांचा प्लॅन:
या पोस्टपेड प्लॅनमध्ये २०० GB डेटा दिला जातो. यासोबत ५०० GB पर्यंतचा डेटा रोलओव्हर, ३ अतिरिक्त सिम कार्ड, अमर्यादित व्हॉइस कॉल, १०० SMS दररोज, Jio अॅप्स आणि Netflix, Disney + Hotstar आणि Amazon Prime सबस्क्रिप्शन दिले आहेत. या प्लॅनमध्येही डेटा लिमिट संपल्यानंतर ग्राहकांना १ GB साठी १० रुपये आकारले जातात.
१४९९ रुपयांचा प्लॅन:
यामध्ये ग्राहकांना ३०० GB डेटा दिला जातो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, १ GB साठी १० रुपये आकारले जातात. यासोबतच ५०० GB पर्यंतचा डेटा रोलओव्हर, अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज १०० SMS, Jio अॅप्सचा अॅक्सेस आणि Netflix, Disney + Hotstar आणि Amazon Prime वर मोफत प्रवेश देण्यात आला आहे. या प्लॅनमध्येही डेटा लिमिट संपल्यानंतर ग्राहकांना १ GB साठी १० रुपये आकारले जातात.