Amazon deal : Amazon वरून OnePlus 9 खरेदी करा 36,999 रुपयांना, जाणून घ्या काय आहे ऑफर

फोना-फोनी
Updated Mar 31, 2022 | 21:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Amazon deal : OnePlus 10 Pro लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने जुन्या OnePlus 9 सीरीजच्या किंमतीत कपात केली आहे. OnePlus 9 5G ची किंमत भारतात 5,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. ही कायमस्वरूपी किंमत कपात आहे आणि फोनच्या सर्व प्रकारांवर लागू आहे.

Buy OnePlus 9 from Amazon for Rs 36,999, find out what's on offer
OnePlus 9 सीरीजच्या किंमतीत कपात   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • OnePlus 9 5G ची किंमत 5,000 रुपयांनी कमी झाली आहे
  • कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर 8,000 रुपयांची अतिरिक्त झटपट सूट दिली जात आहे.
  • वनप्लस 9 मोबाईल स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह येतो

Amazon deal :  OnePlus 10 Pro लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने जुन्या OnePlus 9 सीरीजच्या किंमतीत कपात केली आहे.OnePlus 9 5G ची किंमत भारतात 5,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. ही कायमस्वरूपी किंमत कपात आहे आणि फोनच्या सर्व प्रकारांवर लागू आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर 8,000 रुपयांची अतिरिक्त झटपट सूट दिली जात आहे. यासह, फोनची किंमत 36,999 रुपये असेल. ही किंमत फोन लॉन्च झाल्यापासूनची सर्वात कमी किंमत आहे.

OnePlus 9 5G ची किंमत 5,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. यासह, 8GB रॅम असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत आता 44,999 रुपये आणि 12GB रॅम वेरिएंटची किंमत 49,999 रुपये झाली आहे. ही किंमत कपात OnePlus 9 5G च्या तिन्ही कलर पर्यायांवर लागू आहे. नवीन किंमती कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर पाहता येतील.

अधिक वाचा : तुमच्यासाठी आनंदाची बातमी! अल्पबचत योजनावरील व्याजदर जैसे थे

ही आहे डील

तुम्ही Amazon वरून OnePlus 9 5G खरेदी केल्यास, तुम्हाला Citi Bank क्रेडिट कार्ड फुल स्वाइप आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर रु.8,000 ची झटपट सूट मिळेल.


या सवलतीनंतर, ग्राहक OnePlus 9 5G चे 8GB रॅम मॉडेल 36,999 रुपयांना आणि 12GB RAM मॉडेल 41,999 रुपयांना खरेदी करू शकतील. OnePlus 9 या किमतीत खरेदी करण्याचा एक चांगला पर्याय आहे.

अधिक वाचा : या वस्तूंमुळे खिसा होणार मोकळा


OnePlus 9 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB LPDDR5 RAM सह Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर, 48MP + 50MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, 120Hz AMOLED डिस्प्ले, 4,500 mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी