Reliance Jio Cheapest Plan : मुंबई : मुकेश अंबानींच्या रिलायन्सची जिओ ही भारतातील एक लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. स्वस्त आणि आकर्षक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करणे हे जिओचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनमुळे वर्क फ्रॉम होम करत असलेल्यांसाठी जिओ कंपनीने जिओ रीचार्ज प्लॅन २०२२ Jio Recharge Plan 2022 आणला आहे. हा ८४ दिवसांचा प्लॅन आहे. यात दररोज ३ जीबी इंटरनेट 3 GB Internet या पद्धतीने ८४ दिवसांत २५२ जीबी इंटरनेट 252 GB Internet ग्राहकांना मिळणार आहे. जिओचा हा प्लॅन ११९९ रुपयांत ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
ज्या ग्राहकाने जिओ रीचार्ज प्लॅन २०२२ Jio Recharge Plan 2022 घेतला आहे अशा ग्राहकाने एखाद्या दिवशी त्याच्या पॅकमधील ३ जीबी इंटरनेट लवकर संपवले तर दिवसाच्या उर्वरित वेळेसाठी त्याला ६४ केबीपीएसने इंटरनेट मिळेल. तसेच ग्राहकाला दररोज १०० एसएमएस फुकटात उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त जिओ क्लाउड, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही यांच्यासह सर्व जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन ग्राहकांना मिळेल.
ज्या ग्राहकांना ११९९ रुपयांचा प्लॅन नको आहे अशा ग्राहकांसाठी जिओने ७१९ रुपयांचा प्लॅन आणला आहे. यात दररोज २ जीबी इंटरनेट 2 GB Internet या पद्धतीने ८४ दिवसांत १६८ जीबी इंटरनेट 168 GB Internet ग्राहकांना मिळणार आहे. पॅकमधील इंटरनेट संपल्यास ग्राहकाला दिवसाच्या उर्वरित वेळेसाठी ६४ केबीपीएसने इंटरनेट मिळेल. तसेच ग्राहकाला दररोज १०० एसएमएस फुकटात उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त जिओ क्लाउड, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही यांच्यासह सर्व जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन ग्राहकांना मिळेल.