Reliance Jio | दररोज 3GB डेटा आणि ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह हा आहे Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन

Jio Offer : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) स्वस्त आणि सर्वोत्तम डेटा प्लॅनच्या आधारे बाजारात आघाडी घेतली आहे. मागील महिन्यापासून सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. दरम्यान, Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊयात, ज्यामध्ये दररोज 3GB डेटा उपलब्ध आहे आणि त्याची व्हॅलिडिटीदेखील ८४ दिवस आहे.

Reliance Jio Cheapest Plan
रिलायन्स जिओचा स्वस्त प्लॅन 
थोडं पण कामाचं
  • रिलायन्स जिओचे स्वस्त प्रीपेड प्लॅन
  • 3GB डेटा आणि ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह इतर सुविधा
  • जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड फ्री कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा

Reliance Jio Cheapest Plan: नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) स्वस्त आणि सर्वोत्तम डेटा प्लॅनच्या आधारे बाजारात आघाडी घेतली आहे. मागील महिन्यापासून सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. दरम्यान, Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊयात, ज्यामध्ये दररोज 3GB डेटा उपलब्ध आहे आणि त्याची व्हॅलिडिटीदेखील ८४ दिवस आहे. तसेच, हा प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. (Cheapest recharge plan of Reliance Jio with 3GB data & 84 days validity)

Jio 419 Plan

Reliance Jio ही दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. या कंपनीचे रिचार्ज प्लॅन ग्राहकांना आकर्षित करत असतात. Jio च्या दैनंदिन डेटा प्लॅनमध्ये 1.5GB, 2GB आणि 3GB ऑफर आहेत. आपण 3GB दैनंदिन डेटा प्लॅनबद्दल जाणून घेत आहोत आणि या प्रकारात Jio चा पहिला प्लान ४१९ रुपयांपासून सुरू होतो. यामध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा मिळतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. या प्लॅनद्वारे तुम्ही एका महिन्यात ८४ GB डेटा घेऊ शकता. इतकेच नाही तर ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. यासोबतच, कंपनी दररोज १०० एसएमएसचा लाभ देखील देते.

Jio 601 Plan

रिलायन्स जिओचा ६०१ रुपयांचा प्लॅनही खूप लोकप्रिय आहे. यामध्ये, कंपनी ग्राहकांना दररोज 3GB डेटा व्यतिरिक्त 3GB अतिरिक्त डेटा ऑफर करते. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. या प्लॅनद्वारे यूजर्स ९० GB डेटाचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचे फायदे अजून संपलेले नाहीत. यासह, तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टार VIP सह Jio अॅप्सचे विनामूल्य सदस्यता देखील मिळते. अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही आहे.

Jio 1199 Plan : 3GB डेटा दररोज, ८४ दिवसांची व्हॅलिडिटी

दररोज 3GB डेटाचा लाभ देणारा Jio चा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंगच्या सुविधेसह ग्राहक दररोज १०० एसएमएस देखील करू शकतात. याशिवाय ग्राहकांना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते. या प्लानच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हा प्लान १,१९९ रुपयांचा आहे. ग्राहक ८४ ​​दिवसांपर्यंत या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात.

मागील महिन्यात मोबाइल बिलातील (Mobile bill hike)वाढीमुळे आधीच त्रस्त असणाऱ्या ग्राहकांना आगामी काळात यातून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. २०२२ मध्ये देखील मोबाइल सेवा शुल्कांमध्ये (Mobile tariff hike)वाढ सुरूच राहण्याची चिन्हे आहेत. मोबाइल सेवांच्या पॅकचे शुल्क पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यातच जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) आपल्या सेवांच्या शुल्कात २० ते २५ टक्के वाढ केली होती. याआधी पहिल्या वर्षी २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे किंमतीत वाढ झाली नव्हती. आता २०२२ मध्ये प्रीपेड मोबाइल सेवांच्या शुल्कात पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी