कोरोनापासून बचाव: मोबाइल स्वच्छ करताना या १० गोष्टी लक्षात ठेवा! 

फोना-फोनी
Updated Mar 17, 2020 | 14:32 IST

Coronavirus : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढत असताना मोबाइलची स्वच्छता राखणं हा मुद्दा देखील पुढे आला आहे. याचविषयी आम्ही काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. 

corona virus prevention what to do while cleaning your mobile phone know these 10 things
कोरोनापासून बचाव: मोबाइल स्वच्छ करताना या १० गोष्टी लक्षात ठेवा!  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग हा वाढतच चालला आहे. आतापर्यंत ७००० हून अधिक जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. या व्हायरसपासून बचाव व्हावा यासाठी स्वच्छता बाळगणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण दररोज हातात घेणाऱ्या वस्तू स्वच्छ ठेवणं हे देखील खूप महत्वाचं आहे. मोबाइल फोन किंवा स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्याशिवाय आपण क्षणभरही राहू शकत नाही. पण त्याची स्वच्छता केव्हातरीच केली जाते. २०१७ मध्ये अमेरिकन मेडिकल या जर्नलमध्ये एक संशोधन प्रसिद्ध झाले होते. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, स्मार्टफोन हे बॅक्टेरिया आणि व्हायरसचं घर असतात. त्यावेळी हे संशोधन कुणीही फार गांभीर्याने घेतलं नाही. परंतु सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग होत असताना, आपला मोबाइल फोन आणि गॅझेट्स स्वच्छ ठेवण्याची वेळ आली आहे.

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आपले गॅझेट स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आपल्याला स्मार्टफोन स्वच्छ ठेवण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती देणार आहोत. वाचा १० महत्त्वाच्या गोष्टी : 

  1. किंचित ओल्या आणि मऊ कपड्यांचा वापर करा, लेन्स साफ करण्यासाठी ज्या प्रकारच्या कापडाचा उपयोग केला जातो तसं कापड वापरा. 
  2. फक्त जंतुनाशकांचा वापर करुन स्मार्टफोन पुसून टाका, स्मार्टफोन साफ ​​करण्यासाठी ७०% आयसोप्रोपिल अल्कोहोल याचा वापर करता येईल. 
  3. यूएस टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाईडर एटी अँड टीचे म्हणणे आहे की, स्मार्टफोनवर जंतुनाशक फवारणीनंतर ते पुसण्यासाठी पेपर टॉवेलचा वापर करता येतो.
  4. प्रीमियम स्मार्टफोन जे आयपी 68 रेटिंगसह येतात आणि वॉटर-रेझिस्टंट असतात ते साबण पाण्याने किंवा हाताने स्वच्छ केले जाऊ शकतात
  5. आपला फोन स्वच्छ केल्यानंतर आपण आपले हात साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवावेत, स्मार्टफोन साफ ​​करताना डिस्पोजेबल ग्लोव्हज वापरा
  6. आपला स्मार्टफोन साफ ​​करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ब्लीच वापरू नका
  7. आपला स्मार्टफोन साफ ​​करण्यासाठी कोणत्याही व्हिनेगरचा (vinegar) वापर करू नका
  8. Apple कंपनीचं म्हणणं आहे की, स्प्रे क्लीनरचा वापर थेट iPhone साफ करण्यासाठी करु नये.
  9. डीप क्लीन करण्यासाठी आपला स्मार्टफोन कोणत्याही द्रव पदार्थामध्ये थेट बुडवू नका. 
  10. आपला स्मार्टफोन साफ ​​करण्यासाठी थेट अल्कोहोलचा वापर करु नये. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...