Free Internet: केरळ सरकारचा निर्णय; BPL कुटुंबियांना रोज देणार मोफत 1.5 जीबी डेटा

फोना-फोनी
भरत जाधव
Updated May 09, 2022 | 17:07 IST

सध्या स्मार्टफोन (Smartphone) आणि इंटरनेट (Internet) अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. ह्या दोन्ही गोष्टी मानवाच्या जीवनातील महत्त्वाच्या गरजा झाल्या आहेत. हाच धागा पकडत केरळ सरकारने (Government of Kerala) एका अनोखा मोठा निर्णय घेतला आहे. या आधीच्या काळात सरकार गरीबांना मोफत अन्नधान्य देत असतं.

free 1.5 GB of data daily to BPL  families
केरळमध्ये मिळतोय मोफत 1.5 जीबी डेटा, सरकारचा नवा निर्णय   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • नागरिकांना मोफत मिळणार इंटरनेट.
  • 20 लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना मिळेल योजनेचा फायदा.
  • मे महिन्याच्या अखेरपर्यंत BPL कुटुंबाना मोफत इंटरनेट सर्विस प्रदान करण्यासाठी तयारी सुरू

नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोन (Smartphone) आणि इंटरनेट (Internet) अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. ह्या दोन्ही गोष्टी मानवाच्या जीवनातील महत्त्वाच्या गरजा झाल्या आहेत. हाच धागा पकडत केरळ सरकारने (Government of Kerala) एका अनोखा मोठा निर्णय घेतला आहे. या आधीच्या काळात सरकार गरीबांना मोफत अन्नधान्य देत असतं. मात्र, आता केरळ सरकार याही पुढे पाऊल टाकत नागरिकांना मोफत इंटरनेट (Free internet) प्रदान करणार आहे. केरळ सरकारने विधानसभा क्षेत्रात मे महिन्याच्या अखेरपर्यंत BPL कुटुंबाना मोफत इंटरनेट सर्विस प्रदान करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. 

सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत 20 लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना मोफत इंटरनेट सुविधा पुरवली जाईल. या प्रोजेक्टला वर्ष 2017 मध्ये केरळ सरकारद्वारे लाँच करण्यात आले होते व याला ऑप्टिकल फायबर नेटवर्क (K-FON) असे नाव दिले होते.रिपोर्टनुसार, ही योजना केरळ स्टेर आयटी इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या अंतर्गत चालवली जाते. संस्थेने आधीच इंटरनेट सर्विस प्रोव्हाइडर्सकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) मागवले आहेत, जे यूजर्सला इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करतील. K-FON प्रोजेक्टचे प्रमुख संतोष बाबू म्हणाले की, सुरुवातीला प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील केवल 100 कुटुंबाना सुविधा दिली जाईल. मोफत इंटरनेट मिळणाऱ्या कुटुंबाची संख्या वेळेनुसार वाढत जाईल. तसेच, सरकार 30 हजारांपेक्षा अधिक सरकारी संस्थांमध्ये हाय-स्पीड इंटरनेट सर्विस प्रदान करण्याच्या जवळ पोहचले आहे.

या योजनेंतर्गत सरकार दररोज 10 Mbps ते 15 Mbps च्या स्पीडने ठराविक कुटुंबांना 1.5 जीबी डेटा मोफत देईल. प्रोडेक्टसाठी टेंडर आधीच मागवण्यात आले आहेत. जेणेकरून लोकल इंटरनेट सर्विस प्रोव्हाइडरची निवड करता येईल. राज्य सरकारची योजना मे 2022 अखेर पर्यंत ठराविक कुटुंबांना मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याची आहे. ठराविक कालावधीत लोकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारकडे थोडाचअवधी आहे. प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात सरकार 500 कुटुंबांना मोफत इंटरनेट सर्विस प्रदान करेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी