Data TSunami | 'सुनामी'गत डेटा हवांय का भाऊ? दररोज 2GB डेटा फक्त 4 रुपयात तेही 365 दिवसांसाठी...पाहा तुफान प्लॅन

BSNL 4G Data Voucher Pack : मित्रांनो आजच्या स्मार्टफोनच्या आणि डिजिटल युगात डेटा (Data)हा आपला श्वासच झाला आहे. आपल्याला आता इंटरनेट (Internet) वापराची इतकी सवय लागली आहे की थोडथोडक्या डेटा पॅकने आपली गरज भागतच नाही.यासाठी दूरसंचार कंपन्यांनी 4G डेटा व्हाउचर अॅड-ऑन डेटा पॅकची (4G Data Voucher Pack)आयडिया शोधून काढली आहे. हे पॅक घेतले की ग्राहकांना अतिरिक्त किंमतीवर डेटा मिळतो जो ते त्यांच्या दैनंदिन डेटा संपल्यावर वापरू शकतात. पाहा बीएसएनएलचे डेटाची सुनामी आणणारे डेटा पॅक.

BSNL Data Voucher Pack
बीएसएनलचे जबरदस्त डेटा व्हाउचर पॅक 
थोडं पण कामाचं
  • आजच्या स्मार्टफोनच्या आणि डिजिटल युगात डेटा (Data)हा आपला श्वासच झाला आहे.
  • दूरसंचार कंपन्यांनी 4G डेटा व्हाउचर अॅड-ऑन डेटा पॅकची (4G Data Voucher Pack)आयडिया शोधून काढली
  • बीएसएनएलने (BSNL Data Pack) भन्नाट डेटा व्हाउचर पॅकच्या ऑफर आणल्या आहेत.

BSNL best data plans : नवी दिल्ली : जसे अन्न हवे, पाणी हवे, श्वास हवा तसेच आता रोज डेटा हवा. नाहीतर जगणेच अवघड होईल बसेल, खरंय ना मित्रांनो. आजच्या स्मार्टफोनच्या आणि डिजिटल युगात, मोबाइलवर मिळणारा डेटा (Data) हा आपला श्वासच झाला आहे. मात्र तो मर्यादित नको तर अमर्यादित हवा. नाहीतर पंचाईतच होते की आपली. आपल्याला आता इंटरनेट (Internet) वापराची इतकी सवय लागली आहे की थोडथोडक्या डेटा पॅकने आपली गरज भागतच नाही. मग त्यासाठी करा जास्तीचा खर्च किंवा घ्या महागडा डेटा प्लॅन. यासाठी दूरसंचार कंपन्यांनी 4G डेटा व्हाउचर अॅड-ऑन डेटा पॅकची (4G Data Voucher Pack)आयडिया शोधून काढली आहे. हे पॅक घेतले की ग्राहकांना अतिरिक्त किंमतीवर डेटा मिळतो जो ते त्यांच्या दैनंदिन डेटा संपल्यावर वापरू शकतात. एरवी जरा कमीच चर्चेत असणाऱ्या बीएसएनएलने (BSNL Data Pack) भन्नाट डेटा व्हाउचर पॅकच्या ऑफर आणल्या आहेत. चला पाहूया बीएसएनएलचे हे प्लॅन काय आहेत. (Do you want huge data with low price, BSNL is offering bumper data plans, check details)

अधिक वाचा : Google Maps ने आणला नवा फीचर, युजरचे वाचणार पैसे, वाचा सविस्तर

4G डेटा व्हाउचर अॅड-ऑन डेटा पॅक

परंतु जर भरपूर डेटा स्वस्तात मिळाला तर चंगळच होईल ना. बीएसएनएलच्या 4G डेटा व्हाउचर अॅड-ऑन डेटा पॅकमुळे तुमच्या तोंडाला असे पाणी सुटू शकते. BSNL आपल्या ग्राहकांना काही डेटा व्हाउचर ऑफर करते आहे. त्यापैकी काही अतिरिक्त फायदे देखील देतात. तुमच्या सोयीसाठी, आम्ही BSNL द्वारे ऑफर केलेल्या सर्व डेटा-अॅड पॅक योजनांची यादी तयार केली आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या फायद्याचा प्लॅन घेऊ शकता.

अधिक वाचा : लवकरच व्हॉट्सअॅप मेसेजला रिअॅक्शन देणे होणार सोपे

बीएसएनएलचा दमदार डेटा व्हाउचर

बीएसएनलच्या ताफ्यातील पहिल्या दोन योजना अतिशय कमी कालावधीच्या आहेत. बीएसएनएल 16 रुपयांमध्ये एक  Mini_16 प्लॅन ऑफर करते आहे. यात कंपनी एका दिवसासाठी 2GB डेटा देते आहे. बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी एक C_DATA56 प्लॅनदेखील देते आहे. यात Zingसोबत 10 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी 10GB डेटा मिळतो आहे. बीएसएनएलच्या ताफ्यात एक डेटा सुनामी पॅकदेखील (Data TSunami)आहे. या पॅकमध्ये 22 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी दररोज 2GB डेटा मिळतो आहे.

अधिक वाचा : Jio Recharge : आयपीएल पहायचंय? मग जियोचा हा खास प्लॅन तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर

28 दिवसांसाठी 40GB डेटा

बीएसएनएलचा Data_WFH_151 पॅक 28 दिवसांसाठी एकूण 40GB डेटा ऑफर करतो आणि Zing च्या अॅक्सेससह येतो. कंपनी STV_198 या पॅकमध्ये 50 दिवसांच्या वैधतेसाठी 198 रुपयांमध्ये दररोज 2GB ऑफर करते. शेवटी, BSNL एक Data_WFH_251 पॅक ऑफर करते ज्यात 28 दिवसांसाठी 251 रुपयांच्या किंमतीत एकूण 70GB डेटा मिळते आणि शिवाय Zing च्या अॅक्सेसदेखील मिळतो.

100GB फक्त 447 रुपयांमध्ये

बीएसएनएलचा पुढील प्लॅन 447 रुपयांच्या किंमतीत येतो आणि एकूण 100GB हाय-स्पीड डेटा ऑफर करतो. 100GB डेटा वापरल्यानंतर, ग्राहकाला 80Kbps चा इंटरनेट स्पीड मिळेल. ही योजना 60 कॅलेंडर दिवसांच्या वैधतेसह येते आणि जरी वेबसाइटवर 'डेटा व्हाउचर' अंतर्गत त्याचा उल्लेख केला गेला असला तरीही, तरीही तो दररोज 100 एसएमएससह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग ऑफर करतो. STV_447 योजनेसह, ग्राहक BSNL Tunes आणि Eros Now मनोरंजन सेवांचे सदस्यत्व घेऊ शकतात.

4 रुपयांमध्ये दररोज 2GB डेटा

बीएसएनएलच्या ताफ्यात खरा हुकमाचा एक्का एक वार्षिक डेटा प्लॅन आहे. यात BSNL त्यांच्या ग्राहकांना एक अद्वितीय वार्षिक डेटा व्हाउचर प्रदान करते. यात ग्राहक DATA_1498 पॅक मिळवू शकतात. हा पॅक 365 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो. मात्र यात कोणतेही कॉलिंग किंवा SMS फायदे नाहीत. तसे पाहिल्यास या प्लॅनमध्ये दररोजचा खर्च फक्त 4 रुपये इतकाच आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी