कोरोना व्हायरसची कॉलर ट्यून त्रास देतेय? अशी करु शकता 'Deactivate'

How to skip Coronavirus Ringtone Alert: टेलीकॉम ऑपरेटर कंपन्यांना भारत सरकारनं सूचना दिली आहे की, लोकांना व्हायरसबद्दल जागरूकता संदेश द्या.

How to skip Coronavirus Ringtone Alert
कोरोना व्हायरसची कॉलर ट्यून त्रास देतेय? अशी करु शकता 'Deactivate'  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबईः चीनच्या वुहानमधून जगभरात पसरणारा कोरोना व्हायरसचा धोका आता भारतातही निर्माण झाला आहे. भारतातल्या बऱ्याच राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव झालेला पाहायला मिळतोय. भारतात आतापर्यंत 60 जणांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या व्हायरसबद्दल जनजागृती करण्यासाठी सरकारनं एक अनोखं पाऊल उचललं आहे. 

भारत सरकारनं सर्व टेलीकॉ ऑपरेटर कंपन्यांना सूचना दिल्या आहेत की, कंपन्यांनी आपल्या सब्सक्राइबर्ससाठी डिफॉल्ट कॉलर ट्यून म्हणून 30 सेकंदांची ऑडिओ क्लिप चालवा. ज्यात कोरोना व्हायरससंबंधी लोकांना जनजागृतीचा संदेश देण्यात येईल. जास्तीत जास्त लोकांना कोरोना व्हायरससंबंधी जागरूकता संदेश पोहोचविणे हा त्याचा हेतू आहे.

30 सेकंदांची ऑडिओ क्लिप 

जेणेकरून लोकांना त्याच्या धोक्याबद्दल जागरूकता येऊ शकेल, ते त्यापासून स्वत: चे संरक्षण करू शकतील आणि अफवा टाळतील. याअंतर्गत, जर टेलीकॉम वापरकर्त्याने दुसर्‍या व्यक्तीला कॉल केला तर पहिल्या 30 सेकंदाची डीफॉल्ट ऑडिओ क्लिप ऐकायला येते. ही ऑडिओ क्लिप संपल्यानंतरच कॉल कनेक्ट केला जातो. 

ग्राहकांना त्यातून हवीय सुटका 

या कॉलर ट्यूनला ग्राहक त्रस्त झाले. मोठ्या संख्येनं यूजर्स या कॉलर ट्यूनमुळे खूश नाही आहेत आणि ते यामधून त्यांना सुटका हवी आहे. प्रत्येकवेळी त्यांना ही ऑडिओ क्लिप ऐकताना कंटाळा येतो. त्यामुळे अनेक जण या ऑडिओ क्लिप हटवण्याचा मार्ग शोधत आहेत. सध्या परिस्थितीत हा मॅसेज संपवण्याचा कोणताही मार्ग नाही आहे, यासाठी तुम्हाला या ऑडिओ क्लिपपासून सुटका हवी असेल तर खालील दिलेले स्टेप्स फॉलो करा. 

काय आहे कोरोना व्हायरस अलर्ट मॅसेज 

कॉल केल्यानंतर 30 सेंकदांच्या ऑडिओ क्लिप मॅसेजमध्ये एका व्यक्ती खोकल्याचा आवाज येतो. त्यानंतर  हा रोग टाळण्यासाठी सावधगिरी आणि बचाव कसा करावा याबाबत सांगितलं जातं. स्वतःला स्वच्छ कसं करायचे, जसं नेहमीच सॅनिटायजर आणि साबणानं हात धुवत राहावं.ज्यामुळे व्हायरस पसरण्याचा धोका कमी होईल. याव्यतिरिक्त इमरजन्सी आणि अन्य माहिती मिळण्यासाठी हेल्पलाइन नंबर 011-23978046 नंबरवर कॉल करा. 

तुम्हाला सांगू इच्छितो की, कोरोना व्हायरसशी संबंधित अलर्ट मॅसेजपासून मुक्त होण्याचा कोणताही उद्देश नाही.

कोरोना व्हायरसच्या कॉलर ट्यूनपासून अशी मिळवा मुक्तता

जेव्हा जेव्हा  एखाद्याला ग्राहकाला कॉल करतो तेव्हा त्यांना ही आपत्कालीन ऑडिओ क्लिप ऐकू येते. हे केवळ जिओ वापरकर्त्यांसाठीच नाही तर एअरटेल आणि इतर टेलिकॉम कंपन्यांमध्येही आहे.

STEP 1 

सुटका करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

येथे आम्ही सांगत आहोत की ही ऑडिओ क्लिप संपेपर्यंत आपण प्रतीक्षा करू शकत नाही आणि ताबडतोब आपल्याला समोराशी संपर्क साधून फोनवर बोलणे आवश्यक आहे, तर आपल्यासाठी एक मार्ग आहे. सर्वांत आधी नंबर डायल करा, 

STEP 2 

कॉल लागल्यानंतर ही स्टेप फॉलो करा

एअरटेल, जिओ, वोडाफोन- आयडिया आणि अन्य टेलिकॉम ऑपरेटरवर कोणत्याही या अवेयरनेस मॅसेज हटवू शकता. यासाठी या स्टेप्स फॉलो करा. मॅसेज सुरू होण्याची वाट बघा आणि त्यानंतर लगेचच 1 दाबा.

STEP 3 

अलर्ट मॅसेज सुरू झाल्यानंतर ही स्टेप फॉलो करा. 

कॉल लागल्यानंतर ऑडिओ क्लिप ऐकायला सुरू होते. तर तात्काळ 1 दाबा. 1 दाबल्यानंतर तुम्हाला तात्काळ तुमच्या फोनवरील हा अलर्ट मॅसेज बंद होईल आणि फोनशी कनेक्ट केलं जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी