युरोप सर्व गॅजेटसाठी फक्त C Type charger वापरणार, लवकरच भारतातही होणार निर्णय; Apple ला फटका

european union makes mandatory c type charger : युरोपियन युनियनच्या संसदेने मोबाइलसह सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेटसाठी C Type charger (सी टाइप चार्जर) वापरण्याचा कायदा केला आहे.

european union makes mandatory c type charger
युरोप सर्व गॅजेटसाठी फक्त C Type charger वापरणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • युरोप सर्व गॅजेटसाठी फक्त C Type charger वापरणार
  • लवकरच भारतातही होणार निर्णय
  • Apple ला फटका

european union makes mandatory c type charger : युरोपियन युनियनच्या संसदेने मोबाइलसह सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेटसाठी C Type charger (सी टाइप चार्जर) वापरण्याचा कायदा केला आहे. लवकरच भारतातही C Type charger (सी टाइप चार्जर) वापरण्याचा निर्णय होणार असल्याचे वृत्त आहे. एकदा भारत सरकारने निर्णय घेतला की जगातील इतर अनेक देश पुढील काही महिन्यांत C Type charger (सी टाइप चार्जर) वापरण्याचा निर्णय घेतील. यामुळे अॅपल कंपनीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. 

युरोपियन युनियनच्या संसदेने सी टाइप चार्जरबाबतचा कायदा मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 रोजी केला. या कायद्यानुसार युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या सर्व देशांमध्ये मोबाइलसह सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेटसाठी सी टाइप चार्जर वापरला जाणार आहे. कायद्यानुसार सर्व कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटसाठी सी टाइप चार्जर ही व्यवस्था 2024 पर्यंत अंमलात आणणार आहे. 

लग्न करायचंय आधी हे बघा

तोंड असं गोड कराल तर होतील मोठे फायदे

जगात अॅपल वगळता इतर अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटसाठी सी टाइप चार्जर वापरला जातो. पण अॅपल कंपनीचा चार्जर सर्वांपेक्षा एकदम वेगळा आहे. यामुळे सी टाइप चार्जरच्या कायद्याचा सर्वात मोठा फटका अॅपल कंपनीला बसणार आहे. त्यांना सी टाइप चार्जरच्या व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी मोठा बदल करावा लागणार आहे. हा बदल अॅपल कंपनीचा निर्मिती खर्च वाढवणार आहे.

जगभर सी टाइप चार्जर वाजवी दरात उपलब्ध असताना अॅपल कंपनीचे चार्जर खरेदी करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. याच कारणामुळे नागरिकांकरिता सी टाइप चार्जरबाबतचा निर्णय फायद्याचा ठरणार आहे असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

युरोपियन युनियनमध्ये 27 देश आहेत. या देशांमध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेटसाठी सी टाइप चार्जरची व्यवस्था 2024 पर्यंत लागू होईल. अॅपल कंपनी युरोपियन युनियनमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटसाठी सी टाइप चार्जर ही व्यवस्था लागू करणार आहे. याकरिता कंपनी त्यांच्या उत्पादनात आवश्यक ते बदल करणार आहे. या बदलांसाठी कंपनी मोठा खर्च करण्याची तयारी करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी