रेडमीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये असणार तीन रियर कॅमेरे आणि बरचं काही

फोना-फोनी
Updated May 08, 2019 | 19:02 IST | टाइम्स नाऊ हिंदी

रेडमीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा टॉप इन लाईन स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर मिळेल. या फोनला फूल स्क्रीन डिझाइन आणि एक पॉप अप सेल्फी कॅमेरा असणार आहे. त्यामुळे सेल्फीप्रेमींसाठी हा फोन पर्वणीच ठरणार आहे.

Redmi Smartphone
रेडमीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: रेडमीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅझेटप्रेमींची उत्सुकता वाढवणारा आहे. या फोनला इन-डिस्प्ले सेंसर आणि एक चांगली बॅटरी लाइफ मिळणार आहे. कंपनीचे महाव्यवस्थापक लू विबिंग यांनी एक फोटो शेअर करून त्याला दुजोरा दिला आहे. मात्र, शाओमी कंपनीने हा स्मार्टफोन कधी लाँच करणार याविषयी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाहीये. शाओमीच्या एका एक्झिक्युटिव्हने त्यांचा नवीन स्मार्टफोन 13 मे रोजी लाँच होण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. पण, अजून कंपनीकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाहीये. एकापेक्षा एक असे फिचर्स असलेला हा कॅमेरा फोन लाँच होऊन आपल्या हातात कधी येतो, याची उत्सुकता रेडमीच्या चाहत्यांना लागली आहे.

पॉप अप सेल्फी कॅमेरा

रेडमीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा टॉप इन लाईन स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर मिळेल. या फोनला फूल स्क्रीन डिझाइन आणि एक पॉप अप सेल्फी कॅमेरा असणार आहे. त्यामुळे सेल्फीप्रेमींसाठी हा फोन पर्वणीच ठरणार आहे. विबिंग यांनी मंगळवारी चीनमधील सोशल मीडिया वेबसाईट वीबोवर या फोनच्या लॉक स्क्रीनचा एक स्क्रीनशॉट शेअर केला. त्यामुळे या फोनची उत्सुकता आता वाढली आहे. विबिंग यांनी फोटो शेअर करताना म्हटले आहे की, याला एकेदिवशी लाँन्च करायला तयार आहे. आयुष्य समाधानी आहे आणि माझ्या अपेक्षांपेक्षा अधिक आहे. पण, त्याच्या या स्क्रीनशॉटमधून किंवा विबिंग यांच्या कमेंटमधून हा स्मार्टफोन कुठला आहे हे, सांगता येणं कठीण असल्याचं बोललं जात आहे.

काय असतील फोनची वैशिष्ट्ये?

स्क्रीनशॉटवरून एवढं लक्षात येत आहे की, या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असणार आहे. विबिंग यांनी काही दिवसांपूर्वी फिंगरप्रिंट सेन्सर महाग असल्याचे म्हटले होते. त्यामुळे फोनच्या किमतीचा विचार करता रेडमीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर असणार नाही, असे म्हटले जात होते. या स्क्रीनशॉटमध्ये बॅटरी लाईफ 44 टक्के दाखवत आहे. यावरून हा स्मार्टफोन एकदा चार्ज झाल्यानंतर दोन दिवस चालू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. फोनमध्ये तीन रियर कॅमेरा सेटअप असेल. त्यात 48 मेगापिक्सल, 8 आणि 13 मेगापिक्सलचे कॅमेरे असणार आहेत. Mi-9 SE मध्ये असणारा कॅमेरा सेट-अप या फोनमध्ये देण्यात आला आहे. त्यात 32MP चा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. रॅम 8GB असून, इंटरनल स्टोरेज 128GB असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
रेडमीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये असणार तीन रियर कॅमेरे आणि बरचं काही Description: रेडमीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा टॉप इन लाईन स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर मिळेल. या फोनला फूल स्क्रीन डिझाइन आणि एक पॉप अप सेल्फी कॅमेरा असणार आहे. त्यामुळे सेल्फीप्रेमींसाठी हा फोन पर्वणीच ठरणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola