Smartphone with 200MP : 125W जलद चार्जिंग, 200MP कॅमेराचा जगातील पहिला स्मार्टफोन पुढील आठवड्यात होणार लॉन्च

Moto Edge 30 Ultra : स्मार्टफोनच्या दुनियेत कॅमेरा हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बनले आहे. जितक्या जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा तितका फोन चांगला हा ग्राहकांचा दृष्टीकोन झाला आहे. आता 200MP कॅमेरा असलेला जगातील पहिल्या स्मार्टफोनची (Moto X30 Pro) लॉन्च होण्याची तारीख खूप जवळ आली आहे. हा फोन 2 ऑगस्टला लॉन्च होणार आहे. अनेक मार्केटमध्ये या हँडसेटची एंट्री मोटो एज 30 अल्ट्रा (Moto Edge 30 Ultra) या नावाने होऊ शकते. लॉन्च होण्यापूर्वी कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर दिसला आहे.

Moto Edge 30 Ultra
मोटो एज 30 अल्ट्रा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 200MP कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन, मोटोरोला करणार लॉंच
  • या हँडसेटची एंट्री मोटो एज 30 अल्ट्रा (Moto Edge 30 Ultra) या नावाने होणार
  • हा फोन Android 12 OS वर काम करेल

New Motorola 200MP fasting charging Smartphone : नवी दिल्ली : स्मार्टफोनच्या दुनियेत कॅमेरा हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बनले आहे. जितक्या जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा तितका फोन चांगला हा ग्राहकांचा दृष्टीकोन झाला आहे. आता 200MP कॅमेरा असलेला जगातील पहिल्या स्मार्टफोनची (Moto X30 Pro) लॉन्च होण्याची तारीख खूप जवळ आली आहे. हा फोन 2 ऑगस्टला लॉन्च होणार आहे. अनेक मार्केटमध्ये या हँडसेटची एंट्री मोटो एज 30  अल्ट्रा (Moto Edge 30 Ultra) या नावाने होऊ शकते. लॉन्च होण्यापूर्वी कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर दिसला आहे. सूचीनुसार, फोनचा मॉडेल क्रमांक XT2241-1 आहे. हे 12GB RAM आणि octa-core Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह येईल. गीकबेंच लिस्ट नुसार हा फोन Android 12 OS वर काम करेल. फोनला गीकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 1252 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 3972 गुण मिळाले आहेत. (First 200 MP camera smartphone with fast charging to launch very soon)

अधिक वाचा : Flipkart Sale: Xiaomi 11, iPhone 12, iPhone 11 वर प्रचंड मोठी सूट

हे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स मिळतील
मोटोरोलाचा हा फोन अनेक प्रीमियम आणि फ्लॅगशिप फीचर्ससह येईल. यामध्ये कंपनी फोटोग्राफीसाठी 200MP चा कॅमेरा देणार आहे. फोनमध्ये असलेल्या या कॅमेरा सेन्सरचे नाव Samsung ISOCELL HP1 आहे. रिपोर्ट्सनुसार, या सेन्सरवरून घेतलेला फोटो 13MB पेक्षा जास्त आकाराचा असू शकतो.

अधिक वाचा: Iphone 12 price cut : ॲपलप्रेमींसाठी गूड न्यूज! आयफोन 12 झाला स्वस्त, जाणून घ्या किंमत

50 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा

50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 12-मेगापिक्सलचा कॅमेरा देखील देणार आहे. फोनमध्ये 6.73-इंचाचा फुल HD + P-OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हे डिस्प्ले सेंटर पंच-होल डिझाइनचे असेल. डिस्प्लेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते 144Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

Motorola X30 Pro 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 अंतर्गत स्टोरेजसह येईल. फोनमध्ये सापडलेली बॅटरी 4500mAh असू शकते, जी 125W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 12 वर आधारित MyUI 4.0 वर काम करेल. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी, अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळणे अपेक्षित आहे. तुमच्या माहितीसाठी कंपनी हा फोन सर्वात आधी चीनमध्ये लॉन्च करणार आहे.

अधिक वाचा: Amazon Prime Day Sale 2022: जवळपास अर्ध्या किंमतीला मिळतील स्मार्टफोन, 'या' मोबाइलवर असेल बंपर सूट

अनेक कंपन्या नवनवीन स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. त्यातच फ्लिपकार्ट आणि  अॅमेझॉन वेगवेगळ्या सेल आणत आहेत. त्यामध्ये स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जाते आहे. आगामी काळात बाजारात अनेक नवीन स्मार्टफोन लॉंच होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी