Flipkart Big Billion Days सेल सुरू, i phone प्रेमींसाठी पर्वणीच, मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट

Flipkart Big Billion Days सेल सुरू झाला आहे. काल प्लस मेंबरसाठी हा सेल सुरू झाला होता. आतज 23 सप्टेंबरपासून सर्वांसाठी हा सेल सुरू झाल आहे. फ्लिपकार्टच्या या सेलवर खुप सार्‍या प्रोडक्ट्सवर घशघशीत डिस्काऊंट्स देण्यात आले आहे. विशेषतः आयफोन प्रेमींसाठी ही पर्वणी आहे. ऍपलचा १४ प्लस प्रो लॉन्च झाला असला तरी ऍपलच्या i Phone 12 आणि 13 वर फ्लिपकार्टवर डिस्काऊंट देण्यात आले आहे. जर तुम्ही आय फोन घेण्याच्या विचारात असला तर जाणून घेऊया फ्लिपकार्टवर किती डिस्काऊंट दिले जात आहे.

i phone
i Phone वर मिळेल दणदणीत डिस्काऊंट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Flipkart Big Billion Days सेल सुरू झाला आहे.
  • फ्लिपकार्टच्या या सेलवर खुप सार्‍या प्रोडक्ट्सवर घशघशीत डिस्काऊंट्स देण्यात आले आहे. विशेषतः आयफोन प्रेमींसाठी ही पर्वणी आहे.
  • i Phone 12 आणि 13 वर फ्लिपकार्टवर डिस्काऊंट देण्यात आले आहे.

Flipkart Big Billion Days : मुंबई : Flipkart Big Billion Days सेल सुरू झाला आहे. काल प्लस मेंबरसाठी हा सेल सुरू झाला होता. आतज 23 सप्टेंबरपासून सर्वांसाठी हा सेल सुरू झाल आहे. फ्लिपकार्टच्या या सेलवर खुप सार्‍या प्रोडक्ट्सवर घशघशीत डिस्काऊंट्स देण्यात आले आहे. विशेषतः आयफोन प्रेमींसाठी ही पर्वणी आहे. ऍपलचा १४ प्लस प्रो लॉन्च झाला असला तरी ऍपलच्या 12 आणि 13 वर फ्लिपकार्टवर डिस्काऊंट देण्यात आले आहे. जर तुम्ही आय फोन घेण्याच्या विचारात असला तर जाणून घेऊया फ्लिपकार्टवर किती डिस्काऊंट दिले जात आहे.  (Flipkart Big Billion Days huge discount on i phone 12 and 13)


iPhone 13

भारतात आजही iPhone 13 ला चांगली मागणी आहे. या फोनमध्ये उत्तम कॅमेरा असून या फोनमध्ये 5 जी सुद्धा आहे. त्यामुळे आगामी काळात हा फोन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

iPhone 13 ची फ्लिपकार्टवरील किंमत

iPhone 13 ज्यात 128 जीबी स्टोरेज आहे त्याची फ्लिपकार्टवर किंमत 56 हजार 990 रुपये इतकी आहे. तर 256 जीबी असलेल्या iPhone 13 ची किंमत  66 हजार 990 रुपये इतकी आहे. 512GB असलेल्या iPhone 13 ची किंमत 86 हजार 990 रुपये इतकी आहे. 


iPhone 13 मिनी

बिग बिलियन डे सेलमध्ये iPhone 13 मिनीची किंमत 58 हजार 990 रुपये इतकी आहे. इंटर्नल मेमरी 256GB असलेल्या iPhone 13 Pro  ची किंमत सध्या 1 लाख 9 हजार 990 रुपये इतकी आहे. तसेच 128GB  इंटर्नल मेमरी असलेल्या iPhone 13ची किंमत ४८ हजार रुपये इतकी आहे. 

iPhone 12

जर तुम्ही आणखी बजेट आयफोन पहात असाल तर तुमच्यासाठी iPhone 12 चा पर्याय आहे. दोनच वर्षांपूर्वी हा फोन लॉन्च झाला आहे. 

iPhone 12 किंमत

फ्लिपकार्टवर 64GB मेमरी असलेल्या iPhone 12 ची किंमत 53 हजार 990  रुपये इतकी आहे. 128GB मेमरी असलेल्या iPhone 12 ची किंमत 58 हजार 990  रुपये इतकी आहे.  256GB मेमरी असलेल्या iPhone 12 ची किंमत 67 हजार 990रुपये इतकी आहे. 

iPhone 11

जर तुम्ही व्हिडीओ किंवा फोटोग्राफीसाठी कॅमेरा बघत असालर तुम्हाला iPhone 11 चा पर्याय आहे. या फोनची कॅमेरा क्वालिटी उत्तम आहे. फक्त या फोनमध्ये 5Gचा समावेश नाहिये. असे असले तरी iPhone 11 हा बजेट फोन आहे. फ्लिपकार्टवर 64GB इंटर्नल मेमरी असलेल्या iPhone 11 ची किंमत 35 हजार 990 रुपये इतकी आहे. 128GB इंटर्नल मेमरी असलेल्या iPhone 11 ची किंमत 39 हजार 990 रुपये इतकी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी