Best Smartphones under 10000 | नवी दिल्ली : फ्लिपकार्ट मोबाइल बोनान्झा सेलची (Flipkart Mobile Bonanza Sale)सुरूवात १७ नोव्हेंबरपासून झाली आहे आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये अनेक स्मार्टफोन (Smartphone) सवलतीच्या दरात विकले जात आहेत. मात्र १०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळणाऱ्या (smartphone under Rs 10,000) आणि मोठी मागणी असणाऱ्या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया. फ्लिपकार्टच्या या ऑफरमध्ये तुम्ही दमदार स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत विकत घेऊ शकता. हे स्मार्टफोन कोणते आहे, त्यांचे वैशिष्ट्ये काय आहे, हे जाणून घेऊया. (Flipkart Mobile Bonanza Sale : Best high demand smartphone under Rs 10,000 in Flipkart sale)
या रियलमी स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे. सोबत ऑक्टा कोअर प्रोसेसरसोबत ५००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सल रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये फोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सवलतीनंतर ७,२९९ रुपये इतकी आहे.
इन्फिनिक्सचा स्मार्टफोनमध्ये ६.८२ इंच एचडी प्लस डिस्प्ले आणि ६००० एमएमएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. इन्फिनिक्स मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. रियरमध्ये १३ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासोबत डेप्थ कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.
या इन्फिनिक्स स्मार्टफोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किमत फ्लिपकार्ट सेल मध्ये डिस्काउंट नंतर ८,२९९ रुपये इतकी आहे.
पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ५००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. पोको मोबाइल फोनमध्ये ६.५३ इंच एचडी प्लस डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी३५ चिपसेट देण्यात आला आहे.
या पोको स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत डिस्काउंट नंतर ८,४९९ रुपये आहे.
मोबाइल फोन जुना किंवा खराब झाल्यावर (Old Smartphone) अनेकवेळा लोक त्याला घरातच पडू देतात. त्यानंतर थोड्या दिवसांनी त्या आपण एकतर गल्लीतील किंवा जवळच्या एका दुकानात विकतो, किंवा भंगारात त्याची रवानगी करतो. मात्र आपल्या स्मार्टफोनला असे हाताळणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण असे फोन नंतर मोबाइल मार्केटमध्ये जातात आणि नंतर हॅकर्स (Hackers)तुमच्या फोनमधील माहिती (Data in smartphone)काढून त्याचा गैरवापर करू शकतात. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हॅकर्स तुमच्या फोनमधून तुमचे फोटो, त्यातील व्हिडिओ, सोशल मीडियासंदर्भातील माहिती आणि इतर वैयक्तिक माहिती चोरतात. यानंतर ते या माहितीचा गैरवापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात किंवा आर्थिक फसवणूक करू शकतात किंवा तुमच्या खात्यातून पैसे चोरू शकतात.