आयफोनवर भरघोस सूट, पण फक्त 'या' तारखेपर्यंत संधी

फोना-फोनी
रोहित गोळे
Updated Feb 14, 2020 | 15:48 IST

Amazon Apple Days Sale:  अॅप्पल चाहत्यांसाठी अमेझॉन शॉपिंग वेबसाइटने एक भन्नाट सेल आणला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना अॅप्पलचे अनेक प्रोडक्ट हे स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

getting great discounts on apple products want apple days sale on amazon til 17 feb  
आयफोनवर भरघोस सूट, पण फक्त 'या' तारखेपर्यंत संधी  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई:  Apple Days Sale: ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉनने आज Apple Days ची घोषणा केली आहे. ज्याच्या माध्यमातून ग्राहक लेटेस्ट आयफोन ११ सीरीज, अॅप्पल वॉच, मॅकबुक खरेदी करु शकतात. यावेळी अनेक भन्नाट डिल्स आणि ऑफर ग्राहकांना मिळणार आहे. हे वेगवेगळ्या ऑफरसह १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत चालू  असणार आहे. आयफोन ११ सीरीजचे फोन हे आता  आतापर्यंतच्या सर्वात कमी दरात ग्राहक खरेदी करु शकतात. आयफोन ११ प्रो हा स्मार्टफोन ९३,९०० रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. तर आयफोन ११ प्रो मॅक्स हा १,०३,९०० रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. 

एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरल्यास आपल्याला आयफोन 11 प्रो वर ६००० रुपये आणि आयफोन 11 प्रो मॅक्सवर ७००० रुपये एवढी अतिरिक्त सूट मिळू शकते. 

अॅप्पल डेजच्या सेल दरम्यान ग्राहकांना मॅकबुक एअरवर ६००० रुपयांचं डिस्काउंट मिळू शकतं. तसंच  अॅप्पल वॉच सीरीज ४ वर तब्बल ३० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. आयफोन XR 64GB स्मार्टफोन देखील ४४,९०० रुपयांना उपलब्ध आहे. यावेळी ग्राहक मॅक अॅक्सेसरीज, आयपॅड अॅक्सेसरीज, आयपॅड आणि आयपॅड प्रोवर देखील सूट मिळवू शकतात. 

या सेलदरम्यान, ग्राहक मॅकबुकवर जवळजवळ ३०,००० रुपयापर्यंत सूट मिळवू शकतात. याव्यतिरिक्त एचडीएफसी कार्ड आणि ईएमआय पर्यायांवर देखील ७,००० रुपयांची तात्काळ सूट मिळू शकते. अॅप्पल  वॉच सीरीज ३ हे २०,९०० रुपये सुरुवाती किंमतीला उपलब्ध आहे. वायरलेस चार्जिंग केससह एअरपॉड्स   १५,९०० रुपयांना उपलब्ध आहे. 

आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्सचे फीचर: 

आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स स्मार्टफोन येतात. ज्याचे फिचर एकसारखेच आहेत. केवळ यांच्या स्क्रिन साइजमध्ये फरक आहे. दोन्हीही स्मार्टफोन एकसारख्या फिचरसोबत येतात. आयफोन 11 प्रो 5.8 इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसोबत येतो. आयफोन 11 प्रो मॅक्स 6.5 इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसोबत मिळेल. दोन्हीही फोनमध्ये एचडीआर सपोर्ट देण्यात आला आहे.

अॅप्पलनं या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रू टोन डिस्प्ले, व्हाइड कलर डिस्प्ले, हॅप्टिक टच, फिंगरप्रिंट रजिस्टेंट कोटिंग, मल्टीपल लॅंगवेज सपोर्ट दिला आहे. हा स्मार्टफोन स्पॅश, वॉटर आणि डस्ट रजिस्टेंट आहे. तसंच हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसोबत येणार आहे. कंपनीनं दोन्ही फोनमध्ये A13 बियोनिक्स चिप दिली आहे. जी थर्ड जनरेशन न्यूरल इंजिनसोबत येईल. 

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, दोन्ही स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, वाइड आणि टेलीफोटो कॅमेरा फिचर देण्यात आलेत. फोनमध्ये विविध कॅमेरा मोड जसं की, पॅनोरोमा, नाइट मोड असे दिलेत. फ्रंटमध्ये एफ 2.2 अपर्चरचा 12 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. जो पोर्टरेट मोड आणि डेप्थ सेंसरसोबत येईल. 

आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स दोन्ही स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ 5.0, एनएफसी, जीपीएस, डिजीटल कंपास, वायफाय, व्हिडिओ कॉलिंग, वोएलटीई, वायफाय कॉलिंग अशा सुविधा मिळतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी