Apple: नेटवर्क नाही म्हणून घाबरताय काय.. तरीही करता येणार कॉल आणि SMS, iPhone 14 मध्ये भन्नाट फीचर

iPhone 14 Features: लवकरच iPhone 14 लाँच होणार आहे. पण आता या फोनबाबत नवनव्या गोष्टी समोर येत आहे. जाणून घ्या याबाबतची नवे खास फिचर्स.

good news for apple users iphone 14 will be able to make calls and sms without network
iPhone 14: नेटवर्कशिवाय करता येणार कॉल आणि SMS 
थोडं पण कामाचं
  • Apple चा पुढचा इव्हेंट 7 सप्टेंबरला
  • iPhone 14 लवकरच होणार लाँच
  • स्वत:च्या उपग्रह कनेक्टिव्हिटी फीचरची घोषणा करणे अपेक्षित

iPhone 14: मुंबई:अमेरिकन कंपनी अॅपलने (Apple) आपला पुढील इव्हेंड 7 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपला आयफोन 14 (iPhone 14) हा नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. ज्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आता एका नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, iPhone 14 स्मार्टफोनमध्ये लो अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटेलाइट कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी देखील असेल. ज्यामुळे यूजर्सला एक विशेष सुविधा मिळेल. याद्वारे, यूजर्स सेल्युलर कव्हरेज नसलेल्या भागातूनही कॉल (Call) करू शकतील आणि SMS देखील पाठवू शकतील. (good news for apple users iphone 14 will be able to make calls and sms without network)

कॅलिफोर्नियामधील रिसर्च फर्म टेलीकॉम, मीडिया आणि फायनान्स असोसिएट्सचे सॅटेलाइट कम्युनिकेशन सल्लागार टिम फरार यांच्या मते Apple ग्लोबलस्टारच्या भागीदारीत आयफोनसाठी स्वतःचे उपग्रह कनेक्टिव्हिटी फीचर याबाबत घोषणा करू शकते. 

ग्लोबलस्टारकडे LEO उपग्रहांचा समूह आहे आणि Apple पुढील आयफोन त्यांना अॅक्सेस करु शकते. इलॉन मस्कच्या (Elon Musk) SpaceX ने नुकतेच मोबाइल सॅटेलाइट इंटरनेट अॅक्सेस देखील लाँच केले आहे. यासाठी एक ट्विटही करण्यात आलं आहे.

अधिक वाचा: WhatsApp Tips : तुमचा इंटरनेट डेटा व्हॉट्सअ‍ॅप खातोय काय? या टिप्सच्या मदतीने वाचवा तुमचा इंटरनेट डेटा

कंपनी आपल्या नवीन सीरीजमध्ये अशा हार्डवेअरची सुविधा देऊ  करू शकते जे LEO उपग्रहाशी कनेक्ट करण्यात सक्षम असतील.
हे फीचर आयफोन 14 यूजर्संना 4G किंवा 5G सेल्युलर कनेक्शनची आवश्यकतेशिवाय कॉल करण्यास आणि SMS पाठविण्यास परवानगी देऊ शकतं.

अधिक वाचा: First Iphone Auction : पहिल्यावहिल्या आयफोनचा लिलाव, इतक्या लाखांची लागली बोली

Apple iPhone 14 ची संभाव्य फीचर्स:

iPhone 14 सीरीजमध्ये अनेक दमदार फीचर्स असणार आहेत. प्रो मॉडेलमध्ये नवीन डिझाईन, जबरदस्त कॅमेरा यासारखे फीचर्स दिले जातील. iPhone 14 सीरीजमधील दोन्ही प्रो मॉडेलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल असं समजतं आहे. यामध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड आणि टेलिफोटो लेन्स असणार आहेत. तसेच, यामध्ये 8K व्हिडिओला देखील सपोर्ट करेल. Apple iPhone 14 Pro मॉडेल 8GB रॅम आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह लाँच केला जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी