Google banned Apps | गुगलने बॅन केले जोकर मालवेअर असलेले दोन स्मार्ट टीव्ही अॅप, पाहा कोणते

Google Banned Apps | गुगलच्या प्ले स्टोअरवर हे धोकादायक अॅप आहेत. या अॅपमध्ये सुरक्षेसंबंधीच्या समस्या असल्याचे लक्षात आल्यावर गुगलने हे पाऊल उचलेले आहे. या दोन अॅप्समध्ये धोकादायक जोकर मालवेअर (Joker malware) असल्याचे समोर आले आहे. इंटरनेटवर युजर्सना स्कॅमपासून वाचवण्यासाठी या प्रकारची कारवाई केली जाते. जर तुम्ही स्मार्ट टीव्ही रिमोट आणि हॅलोवीन कलरिंग हे दोन अॅप डाउनलोड केलेले असतील किंवा वापर असाल तर तुमच्या स्मार्टफोनमधून ते लगेच काढून टाका.

Google Banned Apps
गुगलने घातली स्मार्ट टीव्ही अॅप्स बंदी 
थोडं पण कामाचं
  • गुगलकडून प्ले स्टोअरवरील दोन स्मार्ट टीव्ही अॅप्सवर बंदी
  • या दोन्ही अॅपमध्ये धोकादायक मालवेअर
  • हे अॅप कसे हटवाल आणि स्मार्टफोनमधील इतर अॅप कसे तपासाल

Google Banned Apps | नवी दिल्ली :  गुगलने (Google) प्ले स्टोअरवरील (Play Store) दोन स्मार्ट टीव्ही अॅप्सवर (smart TV apps) बंदी घातली आहे. स्मार्ट टीव्ही रिमोट (Smart TV remote)आणि हॅलोवीन कलरिंग (Halloween Coloring) असे हे दोन अॅप आहेत. गुगलच्या प्ले स्टोअरवर हे धोकादायक अॅप आहेत. या अॅपमध्ये सुरक्षेसंबंधीच्या समस्या असल्याचे लक्षात आल्यावर गुगलने हे पाऊल उचलेले आहे. या दोन अॅप्समध्ये धोकादायक जोकर मालवेअर (Joker malware) असल्याचे समोर आले आहे. इंटरनेटवर युजर्सना स्कॅमपासून वाचवण्यासाठी या प्रकारची कारवाई केली जाते. स्मार्ट टीव्ही रिमोट अॅप १,००० वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. सुरक्षा विश्लेषक तातयाना शिखकोवा यांनी ट्विटरवर या दोन धोकादायक अॅप्सची माहिती दिली आहे. (Google banned two smart TV apps, check the details)

जोकर मालवेअरचा धुडगुस

जोकर मालवेअर हा युजर्सच्या कंटेन्टवर त्यांना माहिती नसताना ताबा मिळवत असतो. याआधी याचवर्षी ५ लाख हुवावे स्मार्टफोनवर जोकर मालवेअरचा शिरकाव झाल्याचे समोर आले होते. तज्ज्ञांना स्मार्ट टीव्ही रिमोट आणि हॅलोवीन कलरिंग या दोन अॅपमध्ये एक खास प्रकारची फाइल आढळून आली. या अॅपमध्ये या मालवेअरद्वारे एक खास प्रकारचा कोड सोडण्यात आला होता. विश्लेषकांनी यासंदर्भातील माहिती गुगलला दिल्यानंतर गुगलने प्ले स्टोअरवरून हे दोन अॅप हटवले आहेत.

तुमच्या फोनमधून मालवेअर कसे हटवाल

जर तुम्ही स्मार्ट टीव्ही रिमोट आणि हॅलोवीन कलरिंग  हे दोन अॅप डाउनलोड केलेले असतील किंवा वापर असाल तर तुमच्या स्मार्टफोनमधून ते लगेच काढून टाका. त्याचबरोबर तुम्ही हे तपासले पाहिजे की या अॅपने असे काही सब्सक्रिप्शन सेवा सुरू केली आहे का ज्यासाठी तुमची परवानगी घेण्यात आलेली नाही किंवा एखादे अॅप डाउनलोड केले आहे ज्यासाठीदेखील तुम्ही परवानगी घेण्यात आलेली नाही.

नेमके काय कराल

  1. तुमच्या फोनमध्ये तुम्ही डाउनलोड न केलेले एखादे अॅप आले आहे का हे तपासा. जर तुम्हाला एखादे असे अॅप आढळून आले तर त्याला लगेच डीलीट करा कारण त्यात धोकादायक मालवेअर असू शकतो आणि तो तुमच्या फोनमध्ये पसरू शकतो.
  2. जर तुमच्या फोनमधील काही अॅप्स इतर अॅपच्या तुलनेत अधिक डेटा वापरत असतील आणि ते तुम्ही वापरत नसाल तर त्यांनादेखील डीलीट करा.
  3. तुमच्या फोनमध्ये असणाऱ्या ज्या अॅप्सबद्दल अॅप स्टोअरवर चांगला फीडबॅक आलेला नाही असे अॅप तुमच्या फोनमधून डीलीट करा. त्याचे पर्यायी अॅप डाउनलोड करा.

UltimaSMS कॅम्पेनसाठी वापरले जाणाऱ्या अॅप्सवरदेखील बंदी

याआधी गुगले १५० अॅप्सवर बंदी घातली होती. गुगल प्ले स्टोअरवर असणारे १५० अॅप्स UltimaSMS या कॅम्पेनमध्ये सहभागी होते. या कॅम्पेनद्वारे फ्रॉड केले जात होते. हे अॅप वापरणाऱ्या युजर्सना प्रिमियन एसएमएस सर्व्हिस जॉइन करण्याचे आमिष दाखवण्यात येत होते. त्यानंतर युजर्सची महत्त्वाची माहिती चोरण्यात येत होती.जर तुमच्या स्मार्टफोनदेखील याप्रकारचे अॅप्स असतील तर त्यांना तात्काळ डिलीट करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी