Google Pixel 3A: गुगलचे सर्वात स्वस्त फोन बाजारात, किंमती ऐकून व्हाल थक्क

फोना-फोनी
Updated May 08, 2019 | 15:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Google Pixel 3A XL: गुगलनं दोन नवीन पिक्सल स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. गुगलचे हे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहेत. पाहुयात पिक्सेल 3A आणि पिक्सेल 3A XLच्या काय किंमती आहेत.

Google Pixel 3A and Google Pixel 3A XL
गुगलचे सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: गुगलनं आय/ओ 2019 मध्ये पिक्सेल 3A आणि पिक्सल 3A XL स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. असं म्हटलं जातं आहे की, गुगलचे हे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहेत. मात्र यांची किंमत प्रीमिअम सेगमेंटमध्ये आहे. मिड रेंज प्रीमिअम सेगमेंटमध्ये सॅमसंग आणि अॅपलला टक्कर देण्यासाठी गुगलनं पिक्सेल 3A सीरिजचे हे दोन फोन समोर आणले आहेत. या फोनमध्ये ग्राहकांना पिक्सेल अॅप्सच्या आणखी सेवा मिळणार आहेत. यात आपल्याला पिक्सेल फोटोग्राफी सॉफ्टवेअर मिळतं, खरंतर या दोन्ही फोनमध्ये पिक्सल 3A आणि पिक्सेल 3A XL पेक्षा स्वस्त हार्डवेअरचा वापर करण्यात आला आहे.

गुगल पिक्सेल 3A आणि पिक्सेल 3A XLचे फीचर

गुगलनं या दोन्ही स्मार्टफोनमध्ये बजेट सेगमेंटच्या हार्डवेअरचा वापर केला आहे. फोनमध्ये पिक्सेल व्हिज्युअल कोरही मिळणार नाही. या फोनमध्ये सिंगल सिम सपोर्ट देण्यात आला आहे, परंतू भारतामध्ये हे दोन्ही फोन ई-सिम सपोर्टबरोबर मिळत आहेत. पिक्सेल 3A आणि पिक्सेल 3A XL स्मार्टफोनमध्ये अँन्ड्रॉईड ९.० पाय देण्यात आलं आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, या दोन्ही फोनना कमीत कमी तीन वर्षापर्यंत ऑपरेटिंग सिस्टम आणि सिक्युरिटी अपडेट मिळणार आहे. पिक्सेल 3A आणि पिक्सेल 3A XL या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मिळत आहे.

पिक्सेल 3A मध्ये 5.6 इंचची फूल एचडी प्लस जीओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तर पिक्सल 3A XL मध्ये 6 इंचची फुल एचडी प्लस जीओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोन ड्रॅगन ट्रेल ग्लाससोबत येतात. पिक्सल 3A आणि पिक्सेल 3A XL स्मार्टफोनमध्ये 12.2 मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंट कॅमेऱ्यासाठी कंपनीने 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. पिक्सेल 3A स्मार्टफोन 3000 एमएएचच्या बॅटरीबरोबर येतो. तर पिक्सेल 3A XL मध्ये 3,700 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय या दोन्ही फोनबरोबर 18 व्हॅटचे चार्जर देण्यात आले आहेत.

 

गुगलच्या पिक्सेल 3A आणि पिक्सेल 3A XL ची किंमत पाहा

भारतातील या स्मार्टफोन्सच्या किंमती बाबत बोलायचं झालं तर गूगल पिक्सेल 3A स्मार्टफोन ३९,९९९ रुपये किंमतीत लॉन्च झाला आहे. तर गुगल पिक्सेल 3A XL ची किंमत ४४,९९९ रुपये इतकी आहे. दोन्ही स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज वेरिएंटसोबत लॉन्च झाले आहेत. भारतात दोन्ही फोन १५ मे रोजी लॉन्च होणार आहेत.

या फोनसाठी आपण ८ मे पासून फ्लिपकार्टवर रजिस्ट्रेशन करू शकता. गुगलनं स्मार्टफोन तीन रंगांमध्ये म्हणजेच क्लिअर व्हाईट, जस्ट ब्लॅक आणि पर्पलिश रंगांमध्ये लॉन्च केला आहे. अमेरिकेतील बाजारात पिक्सेल 3ए स्मार्टफोन ३९९ डॉलर (म्हणजेच जवळपास २८ हजार रुपये) आणि पिक्सेल 3A XL स्मार्टफोन ४७९ डॉलर म्हणजेच जवळपास ३३,५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Google Pixel 3A: गुगलचे सर्वात स्वस्त फोन बाजारात, किंमती ऐकून व्हाल थक्क Description: Google Pixel 3A XL: गुगलनं दोन नवीन पिक्सल स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. गुगलचे हे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहेत. पाहुयात पिक्सेल 3A आणि पिक्सेल 3A XLच्या काय किंमती आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola