महिन्याभरापूर्वी लाँच झालेला स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी

फोना-फोनी
Updated Jun 26, 2019 | 23:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

गुगल पिक्सल  3 A स्मार्टफोन आता आपण स्वस्तात खरेदी करु शकतात. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा सेल आपल्याला स्वस्तात मिळणार आहे. हा स्मार्टफोन महिन्याभरापूर्वीच लाँच करण्यात आला आहे. 

Google_Pixel_3A_sale
(फोटो सौजन्य: गुगल पिक्सल) 

मुंबई: आपण जर नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता आपल्यासाठी एक खुशखबर आहे. कारण की, अवघ्या महिनाभरापूर्वी लाँच झालेला नव्या स्मार्टफोनवर सूट मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा आपण फायदा घेऊ शकतात. गुगलने काही दिवसांपूर्वीच पिक्सल 3 A आणि  3 A XL हे दोन नवे पिक्सल स्मार्टफोन लाँच केले होते. पण आता पिक्सल 3 A या स्मार्टफोनवर कंपनीकडून तब्बल ४००० रुपयांची सूट देण्यात आली आहे. जे ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. ही सूट सर्व प्रीपेड व्यवहारांवर उपलब्ध आहे. 

या डिस्काउंटनंतर आपण हा स्मार्टफोन ३५,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. गुगलने पिक्सल 3 A हा स्मार्टफोन मे महिन्यातच लाँच करण्यात आला होता. ग्राहक हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या क्वॉलकॉम डेज सेलमध्ये खरेदी करु शकतात. तो देखील अगदी कमी किमतीत. फ्लिपकार्टवर हा सेल सुरु झाला असून तो ३० जूनपर्यंत असणर आहे. त्यामुळे तोपर्यंत आपण हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करु शकता. 

गुगल पिक्सल 3 A स्मार्टफोनचे फीचर

गुगल पिक्सल 3 A स्मार्टफोनमध्ये आपल्याला 5.6 इंचीचा फुल एचडी प्लस जीओलेड डिस्प्ले मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. फोनमध्ये आपल्याला अँड्रॉईड 9.0 ही ऑपरेटिंग सिस्टम मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांचा विचार केल्यास या स्मार्टफोनमध्ये  १२.२ मेगापिक्सल सिंगल लेन्स रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 

याशिवाय फ्लिपकार्ट सेलमध्ये इतर स्मार्टफोनवर देखील सूट देण्यात आली आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये आपण आसूस मॅक्स प्रो एम 1, शाओमी पोको एफ 1, रेडमी नोट 7 प्रो, रियल मी 3 प्रो, मोटो वन सह अनेक फोनवर सूट देण्यात आली आहे. नोकिया 6.1 प्लस स्मार्टफोन आपण 12,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. तर ओप्पो आर 17 प्रो स्मार्टफोन आपण या सेलमध्ये 29,990 रुपयात खरेदी करु शकतात. ही किंमत स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
महिन्याभरापूर्वी लाँच झालेला स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी Description: गुगल पिक्सल  3 A स्मार्टफोन आता आपण स्वस्तात खरेदी करु शकतात. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा सेल आपल्याला स्वस्तात मिळणार आहे. हा स्मार्टफोन महिन्याभरापूर्वीच लाँच करण्यात आला आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola