Google Play Store वरून हटवण्यात आले १५० पेक्षा जास्त धोकादायक अॅप्स, तुमच्या फोनमध्ये तर नाहीना!

Google Play Store | गुगल प्ले स्टोअरवर असणारे १५० अॅप्स UltimaSMS या कॅम्पेनमध्ये सहभागी होते.हे अॅप वापरणाऱ्या युजर्सना प्रिमियन एसएमएस सर्व्हिस जॉइन करण्याचे आमिष दाखवण्यात येत होते. त्यानंतर युजर्सची महत्त्वाची माहिती चोरण्यात येत होती.

Google Play Store removed Dangerous Apps
गुगल प्ले स्टोअरन हटवले धोकादायक अॅप्स 
थोडं पण कामाचं
  • अॅंड्राइड स्मार्टफोन (Android Smartphone) वापरणारे ग्राहक गुगल प्लेस्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करतात
  • अनेकदा काही अॅप्स ही अत्यंत धोकादायक असतात
  • अॅप्सचा वापर फ्रॉड, फसवणूक, वैयक्तिक माहिती चोरणे, सायबर गुन्हे इत्यादींसाठी केला जातो

Google Play Store | नवी दिल्ली: डिजिटल युगात मोबाइल अॅप (Mobile App) ही एक महत्त्वाची बाब झाली आहे. अनेक कामे ही मोबाइल अॅपद्वारे केली जातात.  अॅंड्राइड स्मार्टफोन (Android Smartphone) वापरणारे ग्राहक गुगल प्लेस्टोअर (Google Playstore) आणि अज्ञात सोर्सद्वारे हे अॅप डाउनलोड करत असतात. मात्र अनेकदा काही अॅप्स ही अत्यंत धोकादायक असतात. त्यांचा वापर फ्रॉड, फसवणूक, वैयक्तिक माहिती चोरणे, सायबर गुन्हे इत्यादींसाठी केला जात असतो. गुगल प्ले स्टोअरवरून असेच १५० पेक्षा जास्त अॅप्स (Google Play Store removed Apps) काढून टाकण्यात आले आहेत. हे अॅप्स सर्वसामान्य युजर्ससाठी धोकदायक होते. (Google Play Store removed more than 150 Apps, which were dangerous for Users)

UltimaSMS कॅम्पेनसाठी वापरले जात होते अॅप्स

गुगल प्ले स्टोअरवर असणारे १५० अॅप्स UltimaSMS या कॅम्पेनमध्ये सहभागी होते. या कॅम्पेनद्वारे फ्रॉड केले जात होते. हे अॅप वापरणाऱ्या युजर्सना प्रिमियन एसएमएस सर्व्हिस जॉइन करण्याचे आमिष दाखवण्यात येत होते. त्यानंतर युजर्सची महत्त्वाची माहिती चोरण्यात येत होती.जर तुमच्या स्मार्टफोनदेखील याप्रकारचे अॅप्स असतील तर त्यांना तात्काळ डिलीट करा.

अॅप्सद्वारो चोरतात माहिती

Avast Antivirus ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे की या अॅप्सना १ कोटी पेक्षा जास्तवेळा डाउनलोड करण्यात आले आहे. हे सर्व अॅप्स एकाच प्रकारे काम करत होते. UltimaSMS कॅम्पेनमध्ये सहभागी असलेले किंवा त्यासाठी वापरले जाणारे हे अॅप्स गुगल प्ले स्टोअरवरदेखील डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होते. जेव्हा युजर्स या अॅप्सना गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करत होते, तेव्हा अॅप युजर लोकेशन, IMEI आणि फोन नंबरचे ट्रॅकिंग करत होते आणि त्यानंतर याचा वापर करत होते.

कसे होतात स्कॅम किंवा फ्रॉड

या अॅपद्वारे स्कॅम किंवा फ्रॉड करण्यात येतात. यामध्ये कस्टम कीबोर्ड, क्युआर कोड स्कॅनर, व्हिडिओ, फोटो एडिटर, स्पॅम कॉल ब्लॉकर, कॅमेरा फिल्टर यासारख्या श्रेणीतील अॅप्सचा समावेश आहे. हे अॅप्स फोनचा आयएमईआय नंबर, लोकेशन, मोबाइल नंबर इत्यादी माहिती हस्तगत केल्यानंतर स्कॅमर्स म्हणजे सायबर गुन्हेगार ठरवतात की स्कॅम किंवा फ्रॉड कोणत्या देशात आणि कोणत्या भाषेत करण्यात येईल.

हे अॅप्स कसे शोधाल आणि हटवाल

जर तुमच्या स्मार्टफोनमध्येदेखील असे अॅप्स असतील तर वेळीच सावध व्हा. मात्र हे अॅप्स तुम्हाला ओळखता येत नसतील तर तुम्ही स्मार्टफोन्या सेटिंग्सची मदत घेऊ शकतात. स्मार्टफोन ओपन करा आणि त्यामध्ये असलेल्या सेटिंग्स जा. तिथे तुम्हाला अॅप्स आणि नोटिफिकेशनचा पर्याय दिसेल. त्यामध्ये तुम्ही तुमच्या फोनवर असलेल्या सर्वच अॅप्सना पाहू शकता. यासाठी तुम्ही गुगल प्लेस्टोअरचीदेखील मदत घेऊ शकता. अलीकड्च्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत चालली आहे. त्यात मोबाइल अॅप्सचादेखील सुनियोजित पद्धतीने वापर केला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी