Cyber Fraud: थोडीशी चूक पडेल महागात! Google Pay आणि Paytm वापरत असाल तर या ५ टिप्स नक्की जाणून घ्या 

फोना-फोनी
Updated Jun 08, 2022 | 09:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Online Payment । आजच्या धावपळीच्या जगात सगळीकडेच कॅशलेस व्यवहार होत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ऑनलाइन पेमेंट. सध्या मोठ्या प्रमाणात लोक Google Pay, Paytm आणि PhonePe सारख्या 'ऑनलाइन पे'च्या ॲप्सचा वापर करतात.

Here are 5 tips to keep in mind when using Google Pay and Paytm
Google Pay आणि Paytm वापरताना या ५ गोष्टींची काळजी घ्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आजच्या धावपळीच्या जगात सगळीकडेच कॅशलेस व्यवहार होत आहे.
  • त्याचाच एक मुख्य भाग म्हणजे कॅशलेस व्यवहार.
  • तुमचा UPI पिन कोणाशीही शेअर करू नका.

Online Payment । मुंबई : आजच्या धावपळीच्या जगात सगळीकडेच कॅशलेस व्यवहार होत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ऑनलाइन पेमेंट (Online Payment). सध्या मोठ्या प्रमाणात लोक Google Pay, Paytm आणि PhonePe सारख्या 'ऑनलाइन पे'च्या ॲप्सचा वापर करतात. लक्षणीय बाब म्हणजे या ॲप्सद्वारे पेमेंट करताना आपल्याला अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. ऑनलाइन पेमेंटच्या काळात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. तसेच तुमच्या थोड्याशा चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. आज आपण अशाच काही ५ टिप्स बद्दल भाष्य करणार आहोत, ज्यामुळे तुम्ही या ॲप्सच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहाल. (Here are 5 tips to keep in mind when using Google Pay and Paytm). 

अधिक वाचा : बुध ग्रहाचे वृषभ राशीत झाले संक्रमण, वाचा सविस्तर

  1. स्क्रीन लॉक - केवळ फोनमध्येच नाही तर या ॲप्सवरही लॉक ठेवा. फोन हरवल्यास किंवा कोणत्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडल्यास अनेक वेळा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. पासवर्ड ठेवताना तुमचे नाव, मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख वापरू नका. महत्त्वाचे म्हणजे तुमचा पासवर्ड हा इतरांच्या लक्षात येणार नाही असा असणे गरजेचे आहे.
  2. PIN शेअर करू नका - तुमचा UPI पिन कोणाशीही शेअर करू नका. हा नियम तुमच्या मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींनाही लागू होतो. तुमचा पिन इतर लोकांना सापडला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास तो ताबडतोब बदला.
  3. अशा लिंक्सवर क्लिक करू नका - अनेक लोक आपल्याला व्हॉट्सॲपवर किंवा ईमेलवर काही लिंक पाठवतात आणि पैशाचे आमिष दाखवून या लिंकवर क्लिक करण्यास सांगतात. याशिवाय काही फसवणूक करणारी मंडळी बँक कर्मचारी असल्याचे सांगून तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात आणि तुमची माहितीही विचारतात. त्यामुळे कोणत्याही अज्ञात लिंकवर कधीही क्लिक करू नका.
  4. ॲपला अपडेट करत राहा - सर्व ॲप्स बनवणाऱ्या कंपन्या वेळोवेळी अपडेट्स जारी करत असतात. याद्वारे ॲप्समध्ये नवीन फीचर्स जोडले जातात आणि सुरक्षा वाढवली जाते. तुम्ही नेहमी UPI पेमेंट ॲप नवीन वर्जनवर अपडेट केले पाहिजे.
  5. एकापेक्षा जास्त ॲप्सचा वापर करणे टाळा - तुम्ही तुमच्या फोनवर एकापेक्षा जास्त पेमेंट ॲप्लिकेशन्स ठेवणे टाळावे. PlayStore किंवा App Store वरून नेहमी फक्त विश्वासार्ह आणि वेरिफाइट पेमेंट ॲप्लिकेशन्स डाउनलोड केले पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी