Honor 20 Series: चार रिअर कॅमेरा असणारे ऑनरचे स्मार्टफोन भारतात लाँच

फोना-फोनी
Updated Jun 11, 2019 | 18:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Honor 20: ऑनरने भारतात आपले तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या तीनही स्मार्टफोनची खासियत म्हणजे त्यांच कॅमेरे आहेत. पाहा या तीनही स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत.

Honor_20_series
चार रिअर कॅमेरा असणारे ऑनरचे स्मार्टफोन भारतात लाँच (फोटो सौजन्य: ऑनर) 

मुंबई: टेलिकॉम उपकरणं तयार करणारी चीनी कंपनी हुवावेने आपला सब ब्रँड 'ऑनर'चे तीन मोबाइल आज (मंगळवारी) भारतात लाँच केले. ऑनर २० सीरीजमधील हे तीनही स्मार्टफोन आहेत. ऑनर २०, ऑनर २० प्रो आणि ऑनर २० आय हे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमधील महत्त्वाचं फीचर म्हणजे याचा कॅमेरा. ऑनर २० प्रो आणि ऑनर २० यामध्ये चार रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत. तर ऑनर २० आयमध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. 

ऑनर २० प्रो मध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, १६ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर ऑनर २० मध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, १६ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ असिस्ट कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा  मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर ऑनर २० आयमध्ये २४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आणिी २ मेगापिक्सलचा डेप्थ असिस्ट कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी तीनही स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

  1. ऑनर २० प्रोमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.  
  2. ऑनर २० मध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. 
  3. ऑनर २० आय मध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आलेली आहे. 

ऑनर २० प्रो आणि २० मध्ये ७ एनएम किरिन ९८० प्रोसेसर देण्यात आला आहे. २० प्रो मध्ये 4,000 mAh,ऑनर २०  3,750 mAh आणि ऑनर २० आय मध्ये 3,400 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 

दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६.२६ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तर ऑनर २० आयमध्ये ६.२१ इंच स्क्रिन देण्यात आली आहे. 

स्मार्टफोनच्या किंमती: 

  1. ऑनर २० स्मार्टफोन आपल्याला ३२,९९९ रुपयात खरेदी करता येईल.
  2. ऑनर २० प्रो स्मार्टफोन ३९,९९९ रुपयात खरेदी करता येईल. 
  3. ऑनर २० आय स्मार्टफोनची किंमत ही १४,९९९ रुपये एवढी आहे. 

ऑनर २० आय हा १८ जून आणि ऑनर २० हा स्मार्टफोन २५ जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तर ऑनर २० प्रो स्मार्टफोनची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

या स्मार्टफोनसह कंपनीने ऑनर पॅड ५ चे दोन नवे व्हर्जन देखील लाँच केले आहेत. यापैकी एक व्हर्जन हे ८ इंच आणि दुसरं १०.१ इंचीचं आहे. आठ इंच स्क्रीन असलेल्या पॅडमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या पॅडची किंमत ही १५,४९९ रुपये एवढी आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी या पॅडची किंमत ही १७,४९९ रुपये एवढी आहे. 

याशिवाय १० इंचीच्या ऑनर पॅड ५च्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी आणि ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी मॉडलची किंमत ही अनुक्रमे १६,९९९ रुपये आणि १८,९९९ रुपये एवढी आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Honor 20 Series: चार रिअर कॅमेरा असणारे ऑनरचे स्मार्टफोन भारतात लाँच Description: Honor 20: ऑनरने भारतात आपले तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या तीनही स्मार्टफोनची खासियत म्हणजे त्यांच कॅमेरे आहेत. पाहा या तीनही स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola