Spam calls block tips in marathi: स्पॅम कॉल्स येणं हे कुणालाच आवडत नाही. आपल्याला नको असलेले स्पॅम कॉल्स हे वारंवार फोनवर येत असतात आणि यामुळे युजर्स प्रचंड त्रस्त होतात. टेलिमार्केटिंग कॉल्स, ऑटोमेटिक म्हणजेच रोबो कॉल्स आणि तिसरा प्रकार म्हणजे स्कॅम कॉल्स असे विविध कॉल्स युजर्सला येत असतात. या कॉल्समुळे बहुतांश नागरिकांना त्रास होतो. कोरोनाच्या महामारीनंतर या स्पॅम कॉल्सच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. जर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारच्या स्पॅम कॉल्सने त्रस्त आहात तर काळजी करु नका आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही या स्पॅम कॉल्सपासून आपली सुटका करुन घेऊ शकता. (how to block spam calls technology news tips and tricks in marathi)
Spam calls पासून सुटका मिळवण्यासाठी Google अँड्रॉईड युजर्सला दोन पर्याय उपलब्ध करुन देत. हे फीचर्स कॉलर आयडी आणि स्पॅम प्रोटेक्शनवाले आहेत. हे दोन्ही फीचर्स बायडिफॉल्ट म्हणजे आधीपासूनच ऑन असतात. जर युजर्सला हवे असेल तर ते बंद करु शकतात. पण जर तुमच्या फोनमधील हे फीचर्स बंद आहेत तर तुम्ही ते तपासू शकता. आम्ही तुम्हाला या संदर्भातील स्टेप्स सांगणार आहोत. जेणेकरुन स्पॅम कॉल्सपासून तुम्हाला सुटका मिळेल.
अधिक वाचा : Jio Recharge : जियोचा ६६६ रुपयांचा हा प्लॅन झाला २०० रुपयांनी स्वस्त, आणखी बरेच आहेत फीचर्स