Smartphone Charging Tips: स्मार्टफोन झटपट चार्ज करायचाय? मग फॉलो करा या सोप्या टिप्स

Phone charging: इंटरनेट स्वस्त झाल्याने स्मार्टफोन युजर्सच्या फोनचा वापर इतका वाढला आहे की, फोनची बॅटरी लगेचच डाऊन होण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही आपला फोन झटपट चार्ज करू शकता. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo Courtesy: Pexels) 
थोडं पण कामाचं
  • तातडीने तुम्हाला घराबाहेर जायचं आहे मात्र फोन चार्ज नसेल तर? 
  • अशा परिस्थितीत पावर बँक तुमच्या कामी नक्कीच येईल पण पावर बँकने फोनची बॅटरी हवी तशी वेगाने चार्ज होत नाही. 
  • आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोनची बॅटरी फास्ट चार्ज करण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत

Technology Tips and Tricks: सध्याच्या काळात नवनवे स्मार्टफोन (Smartphones) बाजारात लॉन्च होत असल्याचं आपल्याला पहायला मिळतं. ग्राहकांची मागणी लक्षात घेता स्मार्टफोन कंपन्यांनीही फास्ट चार्जिंग सपोर्ट (Fast charging support)सह फोन्स लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, प्रत्येकाकडे असे फोन असतीलच असं नाहीये. इंटरनेटचा वापर जवळपास सर्वच स्मार्टफोन युजर्स करतात आणि त्यामुळे फोनची बॅटरीही (Phone battery) झटपट डाऊन होण्यास सुरुवात होते. त्यानंतर युजर्स हे फोन चार्जिंगला लावतात खरे मात्र, फोन चार्ज होण्यास बराच वेळ लागतो. त्यातच काही तातडीचं काम आलं तर मग चार्जिंग अर्धवट सोडून निघावं लागतं. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही अगदी झटपट फोन चार्ज करू शकतात. (how to charge a smartphone quickly here are some technology tips and tricks in marathi)

चार्जर हा नेहमी वॉल सॉकेटमध्ये प्लग करा

तुम्ही स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी कम्प्युटर, लॅपटॉप किंवा इतर यूएसबी पोर्टचा वापर करत असल्यास तुमचा फोन लगेच चार्ज होणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही वॉल सॉकेटमध्ये चार्जर लावून तेथे फोन चार्जिंग करा जेणेकरुन फोन वेगाने चार्ज होईल.

अधिक वाचा : किंमत 5.25 लाख आणि देते 35Km मायलेज! Maruti ची ही स्वस्त कार खरेदीसाठी झुंबड

फोन बंद करा

चार्जिंग करताना फोन ऑफ करणं शक्य असेल तर तसं नक्की करून पाहा. फोन स्विच ऑफ केल्याने फोनच्या बॅटरीचा वापर होणार नाही आणि त्याच काळात चार्जिंग सुरू असल्याने अगदी झटपट फोन चार्ज होण्यास सुरुवात होईल.

अधिक वाचा : Amazon Prime Day Sale 2022: जवळपास अर्ध्या किंमतीला मिळतील स्मार्टफोन, 'या' मोबाइलवर असेल बंपर सूट

चार्जिंग करताना फोनचा वापर नको

स्क्रीन ऑन केल्याने फोनच्या बॅटरीचा वापर होण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी फोन चार्ज करत असाल त्यावेळी फोनचा वापर करु नका.

अधिक वाचा : Joker Virus Terror: जोकर व्हायरसचा कहर...गुगलने हटवले हे 50 अॅप्स, तुमच्या मोबाइलवर तर नाहीत ना?

Aeroplane Mode

चार्जिंग करत असताना फोन स्विच ऑफ करणं शक्य नसेल तर तुम्ही Aeroplane Mode वर फोन ठेवून चार्जिंग करु शकतात. तसे केल्यास तुमच्या फोनच्या बॅटरीचा उपयोग इतर अॅप्स करणार नाहीत आणि फोन फटाफट चार्ज होईल.

अधिक वाचा : Iphone 12 price cut : ॲपलप्रेमींसाठी गूड न्यूज! आयफोन 12 झाला स्वस्त, जाणून घ्या किंमत

पॉवर बँकचा वापर

जर तुम्हाला एखाद्या कामासाठी तातडीने निघायचं असेल पण फोन चार्ज नसेल तर अशावेळी तुम्ही पॉवर बँकचा वापर करुन आपला फोन चार्ज करू शकतात. मात्र, त्यासाठी पॉवर बँक सुद्धा प्री-चार्ज असणं आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी