Tips and Tricks: चोरी झाल्यानंतर परत मिळेल फोन, करावी लागतील ही तीन कामे

फोना-फोनी
Updated Mar 19, 2021 | 14:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुमचा फोन हरवला अथवा चोरी झाल्यास काही अॅपच्या मदतीने तुम्ही तो परत मिळवू शकता.

mobile
चोरी झाल्यानंतर परत मिळेल फोन, करावी लागतील ही तीन कामे 

थोडं पण कामाचं

  • जर तुम्हाला तुमचा फोन चोरी होण्याची भिती आहे तर सगळ्यात आधी आपल्या फोनमध्ये अँटी थेफ्ट अलार्म अॅप डाऊनलोड करा.
  • Lookout Security and Antivirusअॅपच्या माध्यमातन तुम्ही चोरी अथवा हरवलेला फोनचा शोध घेऊ शकता
  • जर युजरचा फोन चोरी झाला आणि तुमच्या फोनमध्ये थीफ ट्रॅकर अॅप आहे तर हे अॅप तुम्हाला फोन शोधण्यास मदत करेल.

मुंबई: फोन चोरी झाल्यानंतर डेटा लीक होण्याची चिंता असते. मात्र आम्ही तुम्हाला आज अशा टिप्स देत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही हरवलेला अथवा चोरी झालेला फोन परत मिळवू शकता. 

चोरी झालेला फोन परत मिळवू शकता

अनेकदा गर्दी असलेल्या ठिकाणी आपला फोन चुकून खाली पडतो अथवा चोरी होतो. फोन चोरी झाल्यानंतर आपल्या डेटापासून ते कॉन्टॅक्ट संपेपर्यंत अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यानंतर चोरी झाल्यानंतर आपण पोलिसांमध्ये याचा रिपोर्ट करतो. मात्र फोन मिळण्याची शक्यता कमी असते. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचा फोन ट्रेस करू शकता. 

Anti Theft Alarm

जर तुम्हाला तुमचा फोन चोरी होण्याची भिती आहे तर सगळ्यात आधी आपल्या फोनमध्ये अँटी थेफ्ट अलार्म अॅप डाऊनलोड करा. या अॅपचा फायदा आहे की जर एखादा व्यक्ती आपला फोन चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्या फोनमध्ये वेगाने अलार्म वाजू लागेल. जर एखाद्या गर्दीच्या ठिकाणी कोणी तुमचा फोन चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर हा अलार्म तुम्हाला अलर्ट करेल. 

Thief Tracker

जर युजरचा फोन चोरी झाला आणि तुमच्या फोनमध्ये थीफ ट्रॅकर अॅप आहे तर हे अॅप तुम्हाला फोन शोधण्यास मदत करेल. या अॅपच्या मदतीने तुम्ही चोराची संपूर्ण माहिती मिळवू शकता. याशिवाय या अॅपद्वारे तुम्हाला चोरी करणाऱ्या व्यक्तीचा फोटोही मिळेल. 

Lookout Security and Antivirus

Lookout Security and Antivirusअॅपच्या माध्यमातन तुम्ही चोरी अथवा हरवलेला फोनचा शोध घेऊ शकता. चोरी झाल्यानंतर फोन स्विच ऑफ झाला तर हे अॅप तुम्हाला फोनची शेवटच्या लोकेशनचे डिटेल्स देईल. शेवटचे लोकेशन मिळाल्यानंतर फोन शोधण्यास सोपे होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी