Airtel यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी, मिळणार 'ही' सेवा

Airtel Life Insurance Cover Plan : कोरोना व्हायरसचा देशभरात फैलाव वाढत चालला आहे. जर तुम्ही एयरटेलचे ग्राहक असाल तर तुम्हाला एका रिचार्जवर चार लाखांपर्यत लाइफ इंश्योरन्स मिळेल.

Airtel
Airtel यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी, मिळणार 'ही' सेवा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • एयरटेलनं खूप स्वस्त पॉलिसी ऑफर केली आहे.
  • यासाठी वेगळा प्रीमियम देण्याचीही गरज नाही आहे.
  • एयरटेल अशी एक मात्र कंपनी आहे जी सध्या सर्वात स्वस्त लाइफ इंश्योरन्स कव्हर देत आहेत.

मुंबईः देशभरात कोरोना व्हायरसचा फैलाव वाढतोय. अशातच लाइफ इंश्योरन्स घेणं खूप फायदेशीर आहे. तुमच्यासाठी एयरटेलनं खूप स्वस्त पॉलिसी ऑफर केली आहे. यासाठी वेगळा प्रीमियम देण्याचीही गरज नाही आहे.  तुम्हाला एयरटेल कनेक्शन घेऊन केवळ रिचार्ज करावा लागेल. ज्यावरुन तुम्हाला इंश्योरन्स पॉलिसी मिळून जाईल. एकदा तुम्ही रिचार्ज केल्यावर रिचार्जचं बेनफिट सुद्धा मिळेल आणि लाइफ इंश्योरन्स दोन्ही मिळेल. 

एयरटेल अशी एक मात्र कंपनी आहे जी सध्या सर्वात स्वस्त लाइफ इंश्योरन्स कव्हर देत आहेत. जर तुमच्याकडे आधीपासून एयरटेलचं सिम कार्ड नसेल तर ते तुम्ही खरेदी करा. ते सिम कार्ड तुमच्या मोबाइलमध्ये टाकून रिचार्ज करा. ज्यामुळे तुमचं लाइफ इंश्योरन्स कव्हर मिळेल. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवर 179 रुपये किंवा 279 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. 

179 रुपयांचा रिचार्जवर इंश्योरन्स

एयरटेल नंबरवर 179 रुपयांचा रिचार्ज केल्यावर 28 दिवसांची व्हॅलिटीडीसोबत लोकल, एसटीडी आणि रोमिंग अनलिमिटेड कॉल फ्री, 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएस मिळतील. सोबतीला 2,00,000 रुपयांचा भारती AXA लाइफकडून टर्म लाइफ इंश्योरन्स मिळेल. 

279 रुपयांच्या रिचार्जवर इंश्योरन्स 

एयरटेल नंबरवर 279 रुपयांच्या रिचार्जवर 28 दिवसांची व्हॅलिटीडीसोबत लोकल, एसटीडी आणि रोमिंग अनलिमिटेड कॉल फ्री, 1.5 जीबी दररोज डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. सोबतच एचएफसी लाइफपासून 4,00,000 रुपयांचा टर्म लाइफ इंश्योरन्स मिळेल. 

अशी करा प्रक्रिया पूर्ण 

जेव्हा तुम्ही तुमचा नंबर रिचार्ज कराल, तेव्हा तुम्हाला पॉलिसी अॅक्टिवेशन एसएमएस प्राप्त होईल. लाइफ इंश्योरन्स पॉलिसी कस्टमरच्या रजिस्टर्ड नावावर होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही तुमचा पत्ता आणि नॉमिनीची डिटेल एयरटेल थॅंक्स अॅपवर भरु शकता. किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही एयरटेल रिटेलरकडून भरु शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी