Mobile Internet: भारतात ४ जी नेटवर्क असूनही इंटरनेट स्पीड २जी स्पीड का? या पाच कारणांमुळे कमी होतोय स्पीड

फोना-फोनी
भरत जाधव
Updated Jun 26, 2022 | 08:59 IST

भारतात पुढील काही महिन्यात ५जी नेटवर्क उपलब्ध होणार आहे. परंतु, अद्याप भारतीय यूजर्सला फास्ट ४जी इंटरनेट स्पीड देखील उपलब्ध नाही. ५ जी नेटवर्क आल्यानंतर स्ट्राँग कव्हरेज आणि सुपर फास्ट इंटरनेट स्पीड मिळेल, असा दावा केला जात आहे. मात्र, यूजर्सची तक्रार आहे की ४जी च्या नावाखाली २जी स्पीड मिळत आहे. ५जी आधी ४जी इंटरनेट स्पीडमध्ये सुधारणा करा, असे यूजर्स म्हणत आहेत. 

Why 2G speed internet speed in India despite 4G network?
भारतात ४ जी नेटवर्क असूनही इंटरनेट स्पीड २जी स्पीड का?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • इंटरनेट यूजर्स आणि डेटा वापराबाबत मोठी वाढ झाली आहे.
  • भारतीय मोबाइल यूजर्सची मोठी संख्या व स्वस्त डेटा प्लान्समुळे भारतातील खासगी टेलिकॉम कंपन्यांना तोटा
  • जिओ नेटवर्कचा डाउनलोड स्पीड २१.१Mbps होता. जो देशातील इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

Mobile Internet Speed : भारतात पुढील काही महिन्यात ५जी नेटवर्क उपलब्ध होणार आहे. परंतु, अद्याप भारतीय यूजर्सला फास्ट ४जी इंटरनेट स्पीड देखील उपलब्ध नाही. ५ जी नेटवर्क आल्यानंतर स्ट्राँग कव्हरेज आणि सुपर फास्ट इंटरनेट स्पीड मिळेल, असा दावा केला जात आहे. मात्र, यूजर्सची तक्रार आहे की ४जी च्या नावाखाली २जी स्पीड मिळत आहे. ५जी आधी ४जी इंटरनेट स्पीडमध्ये सुधारणा करा, असे यूजर्स म्हणत आहेत. भारत इंटरनेट स्पीडच्याबाबतीत जगात ११८व्या क्रमांकावर आहे. हा आकडा Ookla ने यावर्षीच्या सुरुवातीला जारी केला होता. भारतात १५ ऑगस्ट १९९५ ला सर्वसामान्यांसाठी इंटरनेट उपलब्ध करण्यात आले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत यात अनेक सुधारणा झाल्या आहेत. परंतु, इंटरनेट स्पीड कमीच आहे. यामागचे कारण काय आहे, त्याविषयी जाणून घेऊया.

यूजर्सची वाढती संख्या

देशातील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. जेवढे लोक वाढत आहेत, तेवढेच मोबाइल यूजर्सची संख्या देखील वाढत आहे. स्वस्त स्मार्टफोन्स उपलब्ध झाल्याने इंटरनेट मार्केटमध्ये मोठा बदल झाला आहे. याशिवाय, Jio ने मोफत ४जी इंटरनेट उपलब्ध केल्याने यात अधिकच बदल झाला. इंटरनेट यूजर्स आणि डेटा वापराबाबत मोठी वाढ झाली आहे. डेटाची प्रचंड मागणी वाढली आहे व टेलिकॉम कंपन्या ही मागणी पूर्ण करण्यास समर्थ नाही. 

​इंफ्रास्ट्रक्चर

भारतीय मोबाइल यूजर्सची मोठी संख्या व स्वस्त डेटा प्लान्समुळे भारतातील खासगी टेलिकॉम कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे कंपन्यांना इंफ्रास्ट्रक्चरमध्ये देखील सुधारणा करणे शक्य नाही. Reliance Jio आणि Airtel या कंपन्यांनी देखील ARPU वाढवणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे मोबाइल टॅरिफ प्लान्सच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ होऊ शकते. 

​स्पेक्ट्रमचे वाटप

खराब ४जी स्पीडसाठी स्पेक्ट्रम हे देखील मोठे कारण मानले जाते. रिपोर्टनुसार, देशातील लोकसंख्या व मोबाइल यूजर्सच्या तुलनेत ४जी स्पेक्ट्रम खूपच कमी आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सकडे मर्यादित स्पेक्ट्रम असल्याने याचा फटका देखील यूजर्सला बसतो. यामुळे चांगल्या व फास्ट सर्विसची अपेक्षा करणे देखील चुकीचे ठरते. भारतात स्पेक्ट्रमचे वाटप सरकारकडून केले जाते. यामुळे एकप्रकारे याबाबतीत कंपन्या सरकारवर निर्भर असतात. दरम्यान, लवकरच ५जी नेटवर्कसाठी स्पेक्ट्रमचे वाटप होणार आहे. मात्र, कंपन्यांनी महागडे स्पेक्ट्रम खरेदी केल्यास ग्राहकांना देखील सर्विससाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील.

​स्वस्त डेटा प्लान्स

एखादी गोष्ट महाग असेल तर ती चांगली असते, असे आपण सर्वसाधारणपणे म्हणतो. इंटरनेट डेटाच्याबाबतीत देखील ही गोष्ट लागू होते. इतर देशांच्या तुलनेत भारतात इंटरनेटची किंमत खूपच कमी आहे. Jio, Airtel आणि Vi ने गेल्याकाही दिवसात मोबाइल प्लान्सच्या किंमती वाढवल्या होत्या. 
स्वस्त डेटा प्लान्समुळे ४जी नेटवर्क जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले. परंतु, यामुळे low-quality 4G networks चा सामना करावा लागत आहे. स्वस्त प्लान्समुळे कंपन्यांच्या उत्पन्नात देखील घट झाली आहे व यामुळे कंपन्यांना नेटवर्क, सिस्टमला अपग्रेड करणे शक्य होत नाही.

​भारतातील इंटरनेटची स्थिती

जागतिक स्तरावर ४जी इंटरनेट स्पीडबाबत स्टँडर्ड सेट आहे. 4G LTE वर Download Speed १५०Mbps आणि Upload Speed ५०Mbps असणे गरजेचे आहे. तर 4G LTE-Advanced वर सरासरी डाउनलोड स्पीड ३००Mbps आणि अपलोड स्पीड १५०Mbps असणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे भारतात TRAI च्या रिपोर्टनुसार, एप्रिल २०२२ मध्ये जिओ नेटवर्कचा डाउनलोड स्पीड २१.१Mbps होता. जो देशातील इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. एप्रिलमध्ये वीआयचा सरासरी डाउनलोड स्पीड १७.७ Mbps आणि Airtel चा स्पीड १४.१ Mbps होता. तर सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL चा सरासरी डाउनलोड स्पीड ५.९ Mbps होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी