आयफोन-13 लाँच: एक हजार जीबीपर्यंत स्टोअरेज, बॅटरी क्षमतेच्या वाढीसह आहेत जबरदस्त फिचर्स

फोना-फोनी
भरत जाधव
Updated Sep 15, 2021 | 10:00 IST

जगातील नंबर-१ टेक्नोलॉजी कंपनी अॅपलने आपला वार्षिक इव्हेंट ‘कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग’मध्ये मंगळवारी रात्री एकूण ७ उत्पादने लाँच केली.

IPhone-13 launch: storage up to one thousand GB
आयफोन-13 लाँच: एक हजार जीबीपर्यंत स्टोअरेज  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आयफोन-१३ सिरीज आजवरच्या आयफोनमध्ये सर्वाधिक वेगवान
  • आयफोन 13 प्रोची किंमत 1,19,900 रुपये
  • 24 सप्टेंबरपासून विक्री सुरू

नवी दिल्ली : जगातील नंबर-१ टेक्नोलॉजी कंपनी अॅपलने आपला वार्षिक इव्हेंट ‘कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग’मध्ये मंगळवारी रात्री एकूण ७ उत्पादने लाँच केली. यात २ आयपॅड, अॅपल वॉच सिरीज-७ आणि ४ आयफोनचा समावेश आहे. सुमारे दीड तास चाललेल्या कार्यक्रमात कंपनीने दावा केला की, आयफोन-१३ सिरीज आजवरच्या आयफोनमध्ये सर्वाधिक वेगवान असेल. आयफोन-१३ ची मॉडेल्स १२८ जीबी, २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १,००० जीबी (१ टीबी) स्टोअरेजसोबत येतील. कंपनीचे हे दावे टेक्नो प्रेमींच्या भुवया उंचावणारे ठरत आहेत. 

Apple ने प्रो सीरीजच्या किंमतीही घोषित केल्या आहेत. आयफोन 13 प्रोची किंमत 1,19,900 रुपये आणि आयफोन 13 प्रो मॅक्सची किंमत 1,29,900 रुपये आहे. ह्या किंमती मागील वर्षीही सारख्याच होत्या. 12 प्रो आणि 12 प्रो मॅक्सची सुरुवाती याच किंमतींनी झाली होती.  Apple ने आईफोन 13 आणि आयफोन 13 मिनीच्या किंमती मागील वर्षाप्रमाणेच आहेत. आयफोन 13 मिनीच्या  क्रमशः 79,900 रुपये आणि 69,900 रुपये ठेवली आहेत. 24 सप्टेंबरपासून विक्री सुरू केली जाईल. तर 17 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर कर शकतात. 

आयफोनची फिचर्स 

नव्या मालिकेतील फोन ए-१५ बायोनिक चिपसेटने सज्ज असतील. ती इतर कंपन्यांच्या फोनच्या तुलनेत ५०% वेगवान आहे. आयफोन-१३ प्रो आणि प्रो मॅक्समध्ये आधीच्या तुलनेत जास्त क्षमतेची बॅटरी असेल. आयफोन-१३-प्रोची बॅटरी आधीच्या तुलनेत दीड तास, तर आयफोन-१३ प्रो मॅक्सची बॅटरी सुमारे अडीच तास जास्त चालेल. 

आयफोन-१३ च्या किमतीत बदल करण्यात आलेला नाही. आयफोन-१३ प्रो तीन नव्या रंगांत येईल. बेस मॉडेलसाठी स्टोअरेज कपॅसिटी दुप्पट करून १२८ जीबी केली आहे. बॅक साइडमध्ये कॅमेऱ्याचे लेआउट बदलले आहे. हे आयफोन नव्या सिनेमॅटिक मोडसोबत येतील. ए-१५ बायोनिक चिपसेटच्या मदतीने डॉल्बी व्हिजन एचडीआरमध्ये शूट करता येईल. प्रथमच तिन्ही कॅमेऱ्यांत नाइट मोड वापरता येईल.

अॅपल वॉच : ३३% वेगाने चार्जिंग

अॅपल वॉच सिरीज-७ चा नवा रेटिना डिस्प्ले वॉच सिरीज ६ पेक्षा २०% मोठा आहे. सोप्या अॅक्सेससाठी बटण मोठे आहेत. ते फास्ट चार्ज यूएसबी टाइप-सी केबलसह सिरीज ६ च्या तुलनेत ३३% वेगाने चार्ज होईल. ते या वर्षअखेर उपलब्ध होईल.

आयपॅड मिनी : २९,००० रु. पासून सुरू

अॅपलने आयपॅड-९ सिरीजची सुरुवातीची किंमत ३०,९०० रु. ठेवली आहे. वायफाय मॉडेलमध्ये स्क्रीन १०.२ इंच मिळेल. आयपॅड ए-१३ चिप, १२ मेगापिक्सल कॅमेरा, ६४ जीबी स्टोअरेजसह येईल. स्क्रीन ८.३ इंच डिस्प्लेच्या आयपॅड मिनीची सुरुवातीची किंमत २९,००० रु. असेल.  आयफोन-१३ मिनी ६९,००० रुपये तर प्री-ऑर्डर १७ सप्टेंबरपासून, विक्री २४ सप्टेंबरपासून आयफोन-१३ ची किंमत ७९,९०० रुपये तर प्री ऑर्डर १७ सप्टेंबर, विक्री २४ सप्टेंबरपासून, आयफोन-१३ प्रोची किंमत १ लाख १९,९०० रुपये तर विक्री ३० ऑक्टोबरपासून, आयफोन-१३ प्रो मॅक्स १ लाख २९,९०० रुपये, विक्री १३ नोव्हेंबरपासून.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी