फक्त २९ हजारांत लेटेस्ट आयफोन, फ्लिपकार्टच्या ऑफरचा घ्या फायदा

फोना-फोनी
Updated Apr 11, 2021 | 19:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयफोन एसई २०२० (iPhone SE 2020) मध्ये दमदार बॅटरी पॉवर आहे, शिवाय त्यात वायरलेस चार्जिंगदेखील करता येते. त्यामुळे आयफोन फक्त अर्ध्या तासातच ५० टक्क्यांपर्यत चार्ज होऊ शकतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Flipkart gives offer on iPhone SE
फ्लिपकार्टवर आयफोन मिळतोय २९ हजारांत 

थोडं पण कामाचं

  • आयफोन एसई भारतात २९,९९० रुपयांना उपलब्ध
  • फ्लिपकार्टची ऑफर
  • फोनमध्ये अॅपलच्या ए१३ बायोनिक चिप

नवी दिल्ली : अॅपलच्या आयफोनची भूरळ प्रत्येकालाच असते. आयफोन एसई भारतात २९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. मागील वर्षी आयफोन एसई ४२,९०० रुपयांच्या किंमतीवर बाजारात आणण्यात आला होता. या फोनमध्ये अॅपलच्या ए१३ बायोनिक चिप असते. हीच चिप अॅपलच्या आयफोन ११ सेरिजमध्येदेखील असते. आयफोन एसई २०२० ची किंमतीवर फ्लिपकार्टवर सूट देण्यात आली आहे. ६४ जीबीच्या इंटर्नल स्टोरेजसाठीचा आयफोन एसई २९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. तर १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज क्षमतेचे मॉडेल ३४,९९९ रुपये आणि ४४,९९९ रुपयांना उपलब्ध आहेत. हे दोन्ही मॉडेल बाजारात आले तेव्हा अनुक्रमे ४७,८०० रुपये आणि ५८,३०० रुपयांना उपलब्ध होते.

आयफोन एसई २०२०

आयफोन एसईमधील विविध वैशिष्टये आणि सुविधांचा विचार करता, ४.७ इंच रेटिना एचडी डिस्प्ले, एचडीआर १० प्लेबॅक, डॉल्बी व्हिजन, टच आयडीची सुविधा असलेले होम बटन आणि मोठे बेजल्स यासारख्या सुविधांनी हा फोन युक्त आहे. आयफोन एसई २०२० मध्ये ए१३ बायोनिक चिपसेट असतो. आयफोनच्या ११ सेरिजमध्येदेखील हा चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला टच आयडीची सुविधादेखील देण्यात आली आहे. आयफोन एसई २०२०चा लुक बराचसा आयफोन ८ सारखा आहे.

या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा वाईड कॅमरा देण्यात आला आहे. मात्र सिंगल कॅमराद्वारे तुम्ही या फोनमध्ये पोट्रेट फोटो घेऊ शकत नाही. या फोनचा फ्रंट कॅमरा ७ मेगापिक्सलचा आहे. हा आयफोन डस्ट आणि वॉटरप्रूफदेखील आहे. आयफोन एसई २०२० (iPhone SE 2020)ची  बॉडी ग्लास आणि एअरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियमचा वापर करून बनवण्यात आली आहे. या आयफोनमध्ये ३ जीबी रॅमची सुविधा देण्यात आली आहे.

आयफोन १३च्या इमेज लॉंचपूर्वीच झाल्या लीक


अॅपल आयफोन १३ या मॉडेलला सप्टेंबर २०२१ मध्ये बाजारात आणले जाऊ शकते. जसजशी या फोनच्या लॉंचिंगची तारीख जवळ येते आहे तसतशी त्यासंदर्भातील माहिती लीक होते आहे. या फोनमधील वैशिष्ट्ये लीक होत समोर येत आहेत. आयफोन १३ (iPhone 13)च्या एका लीक झालेल्या फोटोतून हे स्पष्ट झाले आहे की आयफोन १३ चा डिस्प्ले नॉच पहिल्यापेक्षा जास्त असणार आहे. हीच सुविधा आयफोन १३ मिनी (iPhone 13 mini), आयफोन १३ ( iPhone 13), आयफोन १३ प्रो ( iPhone 13 Pro) आणि आयफोन १३ प्रो मॅक्स ( iPhone 13 Pro Max)या सर्वच मॉडेलमध्ये दिली जाणार आहे.

आयफोन १३ आणि आयफोन १३ प्रो मध्ये ६.१ इंच आकाराचा डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. आयफोन १३ प्रो मॅक्स (iPhone 13 Pro Max)मध्ये ६.७ इंच स्क्रीन दिली जाणार आहे. याशिवाय आयफोन १३ मिनी (iPhone 13 mini) हे मॉडेल, आयफोन १२ मिनी (iPhone 12 mini)प्रमाणेच ५.४ इंचाचा डिस्प्ले दिला जाणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयफोन १३ प्रो चा नॉच ५.३५ मिमी लांबीचा असणार आहे तर आयफोन १२ प्रोमध्ये नॉचची लांबी ५.३० मिमी इतकी असणार आहे. तर रुंदीचा विचार करता यावर्षी २०२१ मध्ये येणाऱ्या नवीन आयफोनमध्ये २६.८ मिनीची रुंदी असणार आहे. तर याआधीच्या आयफोनच्या १२ प्रोची रुंदी ३४.८३ एमएम इतकी देण्यात आली होती.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी