भारतातील सर्वात स्वस्त वॉटरप्रूफ डिस्प्ले स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ...

Itel Vision 1: स्मार्टफोन ब्रँड असलेल्या आयटेलने बुधवारी आपला एक बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने 3GB व्हेरिएंट असलेला आयटेल व्हिजन 1 (Itel Vision 1 - 3GB) स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Itel Vision 1
Itel Vision 1 स्मार्टफोन लॉन्च 

मुंबई : स्मार्टफोन ब्रँड आयटेल (Itel) कंपनीने बुधवारी आपला बजेट स्मार्टफोन (Budget Smartphone) लॉन्च केला आहे. आयटेलने बुधवारी तीन जीबी व्हेरिएंट असेलला आयटेल व्हिजन-1 (Itel Vision 1 - 3GB) स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साईट असलेल्या फ्लिपकार्ट (Flipkart)वर 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ डिस्प्ले असलेला देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनणार आहे.

आयटेल व्हिजन 1 या स्मार्टफोनमध्ये 6.08 इंचाचा एचडी डिस्प्लेसह आयपीएस वॉटरड्रॉप इनसेल टेक्नोलॉजीचा वापर यात केलेला आहे. यामध्ये  2.5D curved fully laminated display डी कर्व्हड फुल लॅमिनेटेड डिस्प्ले, लेटेस्ट अँड्रॉईड पाय 9 OS, 4000mAh ची पावरफूल बॅटरी आणि एआय ड्युअल कॅमेरा (AI dual camera) देण्यात आला आहे.

आयटेल व्हिजन -1 स्मार्टफोनचे फिचर्स

1.6 गीगाहर्ट्झ ऑक्टा कोअर प्रोसेसर (1.6 GHz octa-core processor) या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. तसेच ड्युअल सुरक्षेच्या दृष्टीने फिंगर प्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा देखील देण्यात आली आहे. तसेच 4G व्हीओएलटीई आणि वीओ-वायफाय सपोर्टसह असलेला हा स्मार्टफोन 3GB रॅम आणइ 32GB इंटरनल स्टोरेजसह उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनची स्टोरेज क्षमता तुम्ही 128GB पर्यंत वाढवू शकता.

आयटेल व्हिजन -1 स्मार्टफोनची किंमत

ट्रान्झइशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजीत तालपात्रा यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, आयटेल भारतात एक तांत्रिक नवकल्पनांची नवी लाट आणत आहे आणि आज व्हिजन 1 - 3GB स्मार्टफोन लॉन्च केला असून हा एक गेम चेंजर ठरणार आहे. आयटेल व्हिजन 1 -3GB हा स्मार्टफोन अशा ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे जे स्वस्त स्मार्टफोन खरेदी करु इच्छित आहेत आणि जो स्मार्टफोन लेटेस्ट टेक्नोलॉजीने म्हणजेच एचडी वॉटरड्रॉप डिस्प्ले, चांगली बॅटरी लाईफ, फिंगरप्रिंट सेंसर असेल. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये इतकी आहे.

स्मार्टफोनच्या वापरात शिक्षण, आर्थिक व्यवहार, कामासाठी किंवा मित्र-कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आयटेल व्हिजन 1 हा स्मार्टफोन नवीन टेक्नोलॉजी आणि स्वस्त असल्याने एक चांगला पर्याय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी