Jio Recharge : जियोचा ६६६ रुपयांचा हा प्लॅन झाला २०० रुपयांनी स्वस्त, आणखी बरेच आहेत फीचर्स

जियोचा ६६६ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. बहुतांश ग्राहक हा रिचार्ज करतात. या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वॅलिडिटी तसेच दिवसाला दीड जीबी डेटा मिळतो. हा रिचार्ज केल्यामुळे तुम्हाला २०० रुपयांनी डिस्काऊंट मिळेल.

jio recharge
जियो रिचार्ज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जियोचा ६६६ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.
  • बहुतांश ग्राहक हा रिचार्ज करतात.
  • या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वॅलिडिटी तसेच दिवसाला दीड जीबी डेटा मिळतो.

Reliance jio: टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या जियो कंपनी खुप लोकप्रिय आहे. आपल्या स्वस्त रिचार्ज आणि अनलिमिटेड कॉलिंगमुळे ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यात जियोला यश आले आहे. आत जियोने ६६६ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. बहुतांश ग्राहक हा रिचार्ज करतात. या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वॅलिडिटी तसेच दिवसाला दीड जीबी डेटा मिळतो. तसेच ग्राहकांना दिवसाला १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात येते. हा रिचार्ज केल्यामुळे तुम्हाला २०० रुपयांनी डिस्काऊंट मिळेल. यासाठी आम्ही तुम्हाला खास ट्रिक सांगणार आहोत. 

अधिक वाचा :  Mobile Charging : रात्रभर मोबाईल चार्जिंग ठेवलं सुरू, झोपेतच झाला तरुणीचा मृत्यू


मीडिया रिपोर्ट्सनुसार ग्राहकांना Amazon Pay Jio रिचार्जवर एक मोठी ऑफर मिळात आहे. जर कुठलाही नवा युजर Amazon Pay वरून हा ६६६ रुपयांचा रिजार्ज करत असेल तर त्याला २०० रुपयांपर्यत डिस्काऊंट मिळेल. तसेच जर कोणी नवा जियोचा युजर रिचार्ज करतो तर त्याला २५ रुपयांचा कॅशबॅकही मिळातो. परंतु या ऑफरसाठी कंपनीची एक पॉलिसी लागू आहे. या पॉलिसीअंतर्गतच तुम्हाला हे डिस्काऊंट आणि कॅशबॅक मिळेल. रिजार्ज करण्यापूर्वी एकदा Amazon Pay चे अटी आणि शर्ती वाचून घ्यावेत. ६६६ रुपयांचा प्रीपेड प्लॅनमध्ये इंटरनेटची डेली लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64kbps होतो. 

अधिक वाचा : Best Family Cars : 'ही' आहेत छोट्या कुटुंबासाठीची सर्वोत्तम 5 वाहने...देतात जबरदस्त मायलेज

या प्लॅनची खासियत

जियोचे ६६६ रुपयांचा प्रीपेड प्लॅन केल्यास JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud या सेवा मिळतात. तसेच JioTV वर अनेक टीव्ही चॅनेल्स लाईव्ह दिसतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना  JioCinema चेही सबस्क्रिप्शन मिळतं. यात ग्राहकांना चित्रपटांचा आनंद घेता येतो.

अधिक वाचा : Setting on app : Truecaller वर तुमचं नाव दिसू नये असं वाटतं? त्यासाठी करा ही सोपी सेटिंग, वाचा पद्धत

शिवाय या प्लॅनमध्ये JioCloud चीही सेवा मिळते. ज्यांच्या फोनमध्ये इंटर्नल मेमरी कमी असते त्यांच्यासाठी हे ऍप फार कामाचे आहे. हा जियोचा बेस्ट प्लॅन्सपैकी एक आहे. ज्यांना जास्त वॅलिडीटीचे रिचार्ज लागतात त्यांच्यासाठी हा प्लॅन परफेक्ट आहे. या प्लॅनबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही जियोच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.  

अधिक वाचा : BGMI गेमसाठी मुलाने आईची केली हत्या, जाणून घ्या भारत सरकारने बंदी का घातली?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी