Jio, Airtel VoWiFi Service: या 30 स्मार्टफोनवर मिळणार जिओ आणि एअरटेलची नवीन सेवा 

Jio, Airtel VoWiFi : जिओ आणि एअरटेलनं आपल्या ग्राहकांना चांगली कॉलिंग एक्सपीरियंस प्रदान करण्यासाठी व्हाइस ओव्हर वायफाय सेवा जारी केली आहे. जी या 30 स्मार्टफोनवर मिळेल.

Jio, Airtel VoWiFi Service
या 30 स्मार्टफोनवर मिळणार जिओ आणि एअरटेलची नवीन सेवा  

भारतीय टेलीकॉम सेक्टरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रतिस्पर्धा किंवा कोल्ड वॉर बघायला मिळत आहे. 2016 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलीकॉम वेंचर जिओची एन्ट्रीनंतर इंडस्ट्रीमध्ये टॅरिफवरील युद्ध अधिक तीव्र झाले. तथापि, काही काळानंतर हे युद्ध संपले आणि त्यानंतर एजीआर, टॅरिफ हाय अशा घटना घडल्या. आता चांगल्या सुविधांसह नवीन युद्ध सुरू झालं असल्याचं दिसत आहे.

सध्या जिओ आणि एअरटेलने वायफाय कॉलिंग सेवा सुरू केली आहे. याच्या लॉन्चिंगसोबतच सेक्टरमध्ये नवीन लढाई रंगताना दिसेल. एअरटेलनं वॉइस ओव्हर वायफाय सेवा- एअरटेल वायफाय कॉलिंग लॉन्च केला आहे. तर दुसरीकडे जिओनं सुद्धा जिओ वायफायच्या नावानं हिच सेवा पॅन इंडिया स्तरावर जारी केली आहे. 

या फिचरच्या मदतीनं जिओ आणि एअरटेल ग्राहकांना चांगली कनेक्टिव्हिटी आणि इनडोर कॉलिंगची सुविधा मिळेल. वॉइस ओव्हर वायफाय फिचरच्या मदतीनं ग्राहक वायफायच्या मदतीनं इंडोर स्थितीमध्ये चांगली कॉलिंगचा अनुभव उचलू शकतात. ही सेवा सर्व स्मार्टफोन यूजर्ससाठी नाही आहे. जिओची ही सेवा जवळपास 150 स्मार्टफोन उपलब्ध आहे. 

जाणून घेऊया कोणत्या स्मार्टफोनवर जिओ आणि एअरटेल दोन्ही वायफाय कॉलिंग सेवा मिळेल. 

या 30 स्मार्टफोनवर मिळेल सुविधा 

 1. आयफोन 11
 2. सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 प्लस
 3. आयफोन 11 प्रो
 4. शाओमी रेडमी के20 प्रो 
 5. आयफोन 11 प्रो मॅक्स 
 6. सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 
 7. आयफोन एक्स आर
 8. सॅमसंग गॅलेक्सी एम30
 9. आयफोन एक्सएस मॅक्स 
 10. सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लस
 11. आयफोन 6 एस 
 12. सॅमसंग गॅलेक्सी जे6
 13. आयफोन 6एस प्लस 
 14. सॅमसंग ऑन 6 
 15. आयफोन 7 
 16. सॅमसंग गॅलेक्सी ए10 एस 
 17. आयफोन 7 प्लस 
 18. सॅमसंग गॅलेक्सी एस10 ई
 19. आयफोन एसई 
 20. सॅमसंग गॅलेक्सी ए30 एस 
 21. आयफोन 8 
 22. सॅमसंग एम20 
 23. आयफोन 8 प्लस 
 24. सॅमसंग गॅलेक्सी एस 10 
 25. आयफोन एक्स 
 26. आयफोन एक्सएस 
 27. शाओमी पोको फोन 
 28. शाओमी रेडमी के20 
 29. सॅमसंग गॅलेक्सी ए50 एस
 30. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी