मुंबई: रिलायन्स जिओने जिओफोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन 5 विशेष प्लान आणले आहेत. या नवीन प्लानची सुरूवात 52 रुपयांपासून होते. तर सर्वात मोठा प्लान 152 रुपयांचा आहे. जिओच्या प्लानमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. पाचही प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लानची सुरूवात 749 रू च्या वार्षिक प्लानच्यानंतर लगेच झाली आहे. हे प्लान कंपनीद्वारे सामान्य प्रीपेड वापरकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या प्लानसारखाच आहे. जिओफोन वापरकर्त्यांसाठी 22 रुपये, 52 रुपये, 72 रुपये, 102 रुपये आणि 152 रुपये किंमतीचे हे प्लान आहेत.
22 रुपयांचा डेटा पॅक हा सर्वात लहान डेटा पॅक आहे. त्यामध्ये 4G नेटवर्कसह 2GB डेटा 28 दिवसांसाठी दिला जातो. याचसोबत कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सेक्युरिटी आणि जिओ न्यूजसारखे जिओ ऍप मोफत देते.
72 रुपयांचा डेटा पॅकही जिओफोनसाठी दिला जातो. यात दररोज 0.5 जीबी डेटा मिळतो. यात एकूण 14GB डेटा दिला जातो. याची वैधता 28 दिवसांची असते. याचसोबत कंपनी जिओटीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सेक्युरिटी आणि जिओ न्यूजसारखी ऍप मोफत वापरायला देते.
102 रूपयांचा डेटा पॅकही जिओफोन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. दररोज यात 1GB डेटा मिळतो. 28 दिवसांसाठी यात 28 GB डेटा मिळतो. त्याचबरोबर जिओटीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सेक्युरिटी आणि जिओ न्यूजसारख्या ऍपची सुविधा मोफत दिली जाते.
जियोफोनचा पाचवा प्लान 152 रूपयांचा आहे. याचीही वैधता 28 दिवसांची आहे. यात दिवसाला 2GB डेटा मिळतो. म्हणजेच 28 दिवसात एकूण 58 GB डेटा वापरायला मिळतो. यासोबतच इतर सेवाही कंपनी देत असते.
हे केवळ डेटा पॅक असल्याने वापरकर्त्यांना याच व्हॉईस कॉल किंवा मेसेजची सुविधा मिळणार नाही.