Jio: जिओचा धडाका कायम, पाहा आता काय केलंय!

फोना-फोनी
Updated Jul 31, 2020 | 18:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

मोबाईल क्षेत्रात फक्त 4 वर्षांपूर्वी पाऊल ठेवणाऱ्या जिओने भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया अशा भारतातील दिग्गजांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.

Jio reaches 40 crore users in 4 years
जिओचा धडाका कायम, चार वर्षांत जोडले 40 कोटी यूजर्स 

थोडं पण कामाचं

  • एप्रिल-जूनच्या त्रैमासिकात जिओचे एकूण 99 लाख नवे यूजर्स बनले
  • एकूण यूजर्स पोहोचले 39 कोटी 83 लाखांवर
  • भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया अशा भारतातील दिग्गजांना मागे टाकत पटकावला पहिला क्रमांक

नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी जेव्हां दूरसंचार क्षेत्रात (Telecom industry) पाऊल ठेवले तेव्हांपासून त्यांच्या टेलिकॉम कंपनीने प्रचंड वेगाने प्रगती केली आहे. खूप कमी वेळात जिओ (Jio) देशातील पहिल्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी बनली आहे. दिवसागणिक याच्या ग्राहकांची (Customers) संख्या वाढत आहे. 2020-21च्या पहिल्या त्रैमासिकात (Trimester) कोरोना व्हायरसचा (Corona virus) प्रभाव असूनही कंपनी दीड कोटी ग्राहक जोडत 40 कोटीच्या (40 crore) जवळ पोहोचली आहे. 2024पर्यंत 50 कोटी यूजर्स गाठण्याचे मुकेश अंबानी यांचे लक्ष्य आहे. जिओच्या अभ्यासात दिसून आले आहे की जिओने दररोज सरासरी पावणे तीन लाख यूजर्स जोडत चार वर्षांपेक्षा कमी काळात 40 कोटी यूजर्स आपल्यासोबत जोडले आहेत.

एप्रिल-जूनच्या त्रैमासिकात जिओचे एकूण 99 लाख नवे यूजर्स बनले असून एकून यूजर्स 39 कोटी 83 लाखांवर पोहोचले आहेत. फक्त चार वर्षांपूर्वी मोबाईल क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या जिओने भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया अशा भारतातील दिग्गजांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. आता जिओचे पुढील लक्ष्य 2024पर्यंत यूजर्सची संख्या 50 कोटी इतकी करणे हे आहे.

भारताला डिजिटल समाज बनवण्यावर लक्ष- अंबानी

अंबानी यांनी कंपनीच्या या सफलतेवर बोलताना म्हटले की भारतीय स्टार्ट-अप्स आणि जगातील प्रतिष्ठित तंत्रज्ञान कंपन्यांसोबत भागीदारी करून जिओ प्लॅटफॉर्म्स आता डिजिटल बिझनेसच्या पुढील हायपर ग्रोथसाठी तयार आहेत. आमची विकासाची रणनीती सर्व 130 कोटी भारतीयांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने बनलेली आहे. आमचे पूर्ण लक्ष भारताला एका डिजिटल समाजात परिवर्तित करण्याकडे केंद्रित आहे.

स्वस्त स्मार्टफोन आणणार जिओ

मुकेश अंबानी यांनी 15 जुलै रोजी रिलायन्सच्या 43व्या AGMमध्ये कंपनी बाजारात स्वस्त स्मार्टफोन आणणार असल्याची घोषणा केली. याचा उद्देश 35 कोटी 2G ग्राहकांना 4G आणि 5G सेवांअंतर्गत आणण्याचा आहे. पुढील वर्षी देशात 5G सेवा सुरू करण्याचा कंपनीचा उद्देश आहे आणि यासाठीची सर्व तयारी जवळजवळ पूर्ण करण्यात आल्या असून सरकारकडून हिरवा कंदील मिळण्याचा अवकाश आहे.

जिओचा नफा सलग 11व्या त्रैमासिकात वाढला

स्वस्त आणि चांगल्या सेवा देण्याच्या प्रचंड स्पर्धेत इतर कंपन्यांना खूप तोटा सहन करावा लागत असताना रिलायन्स जिओचा नफा मात्र सतत वाढत आहे. गुरुवारी आर्थिक वर्ष 2020-21च्या पहिल्या त्रैमासिकात रिलायन्स जिओचा शुद्ध नफा मागील वर्षाच्या याच अवधीच्या 891 कोटी रुपयांच्या तुलनेत 182.2% वाढून 2,520 रुपये इतका झाला आहे. जिओचा नफा सलग 11ल्या त्रैमासिकात वाढला आहे आणि याचे मुख्य कारण नव्या ग्राहकांच्या संख्येत सतत होणारी वाढ आणि कर्जमुक्तीनंतर आर्थिक दरात झालेली घट आहे.

पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारती एअरटेलला तोटा

काहीच महिन्यांपूर्वी पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारती एअरटेलला यादरम्यान 15933 कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. जिओची यादरम्यानचे संचलन उत्पन्न 12383 रुपयांपासून 33.7%नी वाढून 16557 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यादरम्यान जिओचे व्याज कर मूल्य, ह्रास आणि कर्ज वजा केल्यावर खर्च 7,281 कोटीच्या विक्रमी स्तरावर पोहोचला, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 55.4% अधिक आहे.

त्रैमासिकात एकूण वायरलेस डेटा ट्रॅफिक 30.2% वाढले

मजबूत ग्राहक सेवा आणि सर्वश्रेष्ठ नेटवर्कमुळे त्रैमासिकात एकूण वायरलेस डेटा ट्रॅफिक 30.2%, 1420 कोटी जीबी झाले. लॉकडाऊनदम्यान जिओ नेटवर्कवर प्रति महिना सरासरी वायरलेस डेटाचा वापर वाढून 12.1 जीबी आणि व्हॉईस कॉलिंग 756 मिनिटे झाले. त्रैमासिकात प्रति ग्राहक सरासरी राजस्व 130.6 रुपयांवरून वाढून 140.3 रुपये प्रति महिना झाले आहे. त्रैमासिकादरम्यान जिओ प्लॅटफॉर्म्सवर फेसबुक आणि गूगलसह 13 गुंतवणूकदारांनी 14 प्रस्तावांद्वारे 1 लाख 52 हजार 56 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. एकूण गुंतवणुकीपैकी जिओला दहा गुंतवणूकदारांकडून 115694 रुपये मिळाले आहेत. जिओ प्लॅटफॉर्म्सवर आलेल्या गुंतवणूकीतील 22981 कोटी रुपये कंपनी पुढील विस्तारासाठी ठवणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी