जिओकडून यूजर्संना दिवाळीचं मोठं गिफ्ट, पाहा काय मिळणार

फोना-फोनी
रोहित गोळे
Updated Oct 22, 2019 | 15:59 IST

Jio All In One Plans: जिओने दिवाळीच्या मुहुर्तावर नवे रिचार्ज प्लॅन जारी केले आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये इतर नेटवर्कवरील व्हॉईस कॉलिंगसाठी फ्री मिनिट्स देखील दिले आहेत.

jio gave a diwali gift to users released four all in one prepaid plans
जिओकडून यूजर्संना दिवाळीचं मोठं गिफ्ट, पाहा काय मिळणार  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • जिओने या जारी केले ऑल इन वन प्लॅन्स
  • जिओच्या या नव्या प्लॅन्समध्ये इतर नेटवर्कवरील कॉलिंगसाठी मिळणार मोफत मिनिट्स
  • जिओने चार 'ऑल-इन-वन' प्लॅन केले जारी

मुंबई: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी ग्राहकांसाठी चार नवे रिचार्ज प्लॅन आणले आहेत. ज्यामध्ये त्यांनी जिओ ऑल इन वन प्लॅन जारी केले आहेत. या प्लॅनची सुरुवात २२२ रुपयांपासून होते. या प्लॅनमध्ये यूजर्सला २ जीबी डेटा दररोज अनलिमिटेड जिओ टू जिओ व्हॉईस कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर १००० कॉलिंग मिनिट देण्यात आलं आहे. या नव्या प्लॅन्समध्ये ग्राहकांना इतर नेटवर्कवर मिळणाऱ्या कॉलिंगसाठीचं आययूसी टॉप अप वाउचर मोफत मिळणार आहे. 

Jio new Rs 222 recharge plan: जिओने या प्लॅनमध्ये फ्री जिओ टू जिओ कॉलिंग आणि २ जीबी प्रति दिन डेटा दिला आहे. याशिवाय १०० एसएमएस दररोज देण्यात आले आहेत. या प्लॅनमध्ये १००० कॉलिंग मिनिट्स हे इतर नेटवर्कवरील व्हॉईस कॉलिंगसाठी देण्यात आले आहे. जे सहा पैसे प्रति मिनिट दराने लागू केले जात होते. यासोबतच या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ अॅपचं मोफत सब्सक्रिप्शन आणि २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. 

Jio new Rs 333 recharge plan: जिओने ३३३ रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्संना जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि २ जीबी प्रति दिन डेटा दिला आहे. याशिवाय १०० एसएमएस दररोज देण्यात आले आहेत. या प्लॅनमध्ये १००० कॉलिंग मिनिट्स हे इतर नेटवर्कवरील व्हॉईस कॉलिंगसाठी देण्यात आले आहे. या प्लॅनची वैधता ही ५६ दिवसांसाठी असणार आहे. या प्लॅनमध्ये देखील ग्राहकांना जिओ अॅपचं मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 

Jio new Rs 444 recharge plan: जिओने ४४४ रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्संना जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि २ जीबी प्रति दिन याप्रमाणे १६८ जीबी डेटा दिला आहे. याशिवाय १०० एसएमएस दररोज देण्यात आले आहेत. या प्लॅनमध्ये १००० कॉलिंग मिनिट्स हे इतर नेटवर्कवरील व्हॉईस कॉलिंगसाठी देण्यात आले आहे. या प्लॅनची वैधता ही ८४ दिवसांसाठी असणार आहे. या प्लॅनमध्ये देखील ग्राहकांना जिओ अॅपचं मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 

Jio new Rs 555 recharge plan: जिओने आपल्या ग्राहकांना दिवाळी गिफ्टच्या स्वरुपात जे प्लॅन जारी केले आहेत त्यात ५५५ रुपयांचा प्लॅन देखील आहे. या प्लॅनमध्ये २ जीबी प्रति दिन याप्रमाणे १६८ जीबी डेटा दिला आहे. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांसाठी असणार आहे. ज्यामध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि ३००० कॉलिंग मिनिट्स हे इतर नेटवर्कवरील व्हॉईस कॉलिंगसाठी देण्यात आले आहेत. तसंच १०० एसएमएस प्रति दिन मिळणार आहेत. याप्रमाणेच जिओ अॅपचं मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी