Jio Recharge Plan : दररोज ३ जीबी डेटा आणि ८४ दिवसांच्या वैधतेसह Jio चा हा आहे सर्वात स्वस्त रिचार्ज

Reliance Jio Cheapest Plan | आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने स्वस्त आणि सर्वोत्तम डेटा प्लॅनच्या आधारे इतर कंपन्यांना खूप मागे टाकले आहे. हल्ली सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. दरम्यान, आता या महागड्या किमतींना जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन अपवाद ठरला आहे.

Jio has the cheapest recharge with 3GB data per day and 84 days validity
दररोज ३ जीबी डेटा देणारा जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज   |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जिओच्या रोजच्या डेटा प्लॅनमध्ये १.५ जीबी, २ जीबी आणि ३ जीबी अशा देखील ऑफर आहेत.
  • भारतात रिलायन्स जिओचा ६०१ रुपयांचा प्लॅनही खूप लोकप्रिय आहे.
  • जिओच्या प्लॅनमध्ये ११९९ रूपयांत रोजच्या ३ जीबी डेटासह ८४ दिवसांची वैधता आहे.

Reliance Jio new offer | नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani Asia's Richest Person) यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) स्वस्त आणि सर्वोत्तम डेटा प्लॅनच्या आधारे इतर कंपन्यांना खूप मागे टाकले आहे. हल्ली सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom Company)आपल्या रिचार्ज प्लॅनच्या (Recharge Plan)  किंमती वाढवल्या आहेत. दरम्यान, आता या महागड्या किमतींना जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन अपवाद ठरला आहे. ज्यामध्ये दररोज ३ जीबी डेटा (Daily 3 GB Data) उपलब्ध आहे आणि त्याची वैधता (Validity) देखील ८४ दिवस आहे. तसेच हा प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त देखील आहे. (Jio has the cheapest recharge with 3GB data per day and 84 days validity). 

रिलायन्स जिओ टेलिकॉम (Reliance Jio Telecom) ही दूरसंचार क्षेत्रात इतिहास रचणारी कंपनी आहे. या कंपनीचे रिचार्ज प्लॅन केवळ युजर्स आकर्षित करतात. जिओच्या रोजच्या डेटा प्लॅनमध्ये १.५ जीबी, २ जीबी आणि ३ जीबी अशा ऑफर आहेत. लक्षणीय बाब म्हणजे ३ जीबी दररोजच्या डेटा प्लॅनमध्ये जिओचा पहिला प्लॅन ४१९ रुपयांपासून सुरू होतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनद्वारे ग्राहक एका महिन्यात ८४ जीबी डेटा वापरू शकतात. सोबतच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची (Unlimited Calling) देखील सुविधा आहे. यासोबतच कंपनी दररोज १०० मेसेजचा लाभ देखील देत आहे. 

दरम्यान, भारतात रिलायन्स जिओचा ६०१ रुपयांचा प्लॅनही खूप लोकप्रिय आहे. यामध्ये, कंपनी ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा व्यतिरिक्त ६ जीबी अतिरिक्त डेटा ऑफर करते. या प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनद्वारे युजर्स ९० जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. या प्लॅनचे अनेक फायदे आहते. कारण या प्लॅनमध्ये ग्राहकांना डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीसह (Disney Plus Hotstar Vip)  जिओ ॲप्सचे विनामूल्य सदस्यता देखील मिळते. अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही आहे.

 ११९९ रूपयांत रोजच्या ३ जीबी डेटासह ८४ दिवसांची वैधता

विशेष म्हणजे दररोज ३ जीबी डेटाचा लाभ देणारा जिओचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंगच्या सुविधेसह ग्राहक दररोज १०० मेसेज देखील करू शकतात. याशिवाय ग्राहकांना जिओ ॲप्सचे विनाशुल्क सदस्यत्व देखील मिळते. दरम्यान हा प्लॅन ११९९ रुपयांचा आहे. ग्राहक ८४ ​​दिवसांपर्यंत या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी