Jio New Recharge Plan: काय सांगता! फुकटात बघता येणार आयपीएल अन् तेही कधीही कुठेही, फक्त करावं लागेल हे काम

फोना-फोनी
भरत जाधव
Updated Mar 26, 2022 | 13:36 IST

आजपासून IPL 2022 सुरू होत असून गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहते आयपीएल सुरू होण्याची वाट होते. शेवटी आज या उत्सवाला सुरूवात होणार आहे. जवळपास पुढील दोन महिने क्रिकेटचं युद्ध चालणार आहे.

Jio New Recharge Plan
काय सांगता! फुकटात बघता येणार आयपीएल अन् तेही कधीही कुठेही  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • टेलिकॉम कंपन्या आपल्या रिचार्ज प्लानमध्ये मोफत Disney+Hotstar चे सबस्क्रिप्शन देत आहेत.
  • रिलायन्स जिओने आयपीएल सुरू होण्याआधी आपल्या ग्राहकांसाठी खास २७९ रुपयांचा क्रिक्रेट अ‍ॅड-ऑन प्लान सादर केला आहे.
  • लिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे Disney+ Hotstar च्या सबस्क्रिप्शनसह येणारे अनेक प्लान्स उपलब्ध आहेत.

नवी दिल्ली : आजपासून IPL 2022 सुरू होत असून गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहते आयपीएल सुरू होण्याची वाट होते. शेवटी आज या उत्सवाला सुरूवात होणार आहे. जवळपास पुढील दोन महिने क्रिकेटचं युद्ध चालणार आहे. या आयपीएलचा आनंद तुम्ही टीव्हीवर तर घेऊ शकता, मात्र काम असेल करत तुम्हाला आयपीएलचा आनंद घेता येणार नसून अन् आपल्या आवडत्या टीमला विजयी होताना पाहू शकत नाहीत. जर तुमच्या फोनवरच आयपीएलचा आनंद घेता आला तर. तेही मोफत.  

हो, असं होणं शक्य आहे, अनेक टेलिकॉम कंपन्या आपल्या रिचार्ज प्लानमध्ये मोफत Disney+Hotstar चे सबस्क्रिप्शन देत आहेत. त्यामुळे तुम्हाला कोठुनही घरबसल्या आयपीएलचा आनंद घेता येणार आहे. यातच आता देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने आयपीएल सुरू होण्याआधी खास Cricket Add-On Prepaid Plan लाँच केला आहे. यामुळे तुम्ही खूपच कमी किंमतीत आयपीएलचा आनंद घेऊ शकता. 
चला तर या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Jio चा २७९ रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओने आयपीएल सुरू होण्याआधी आपल्या ग्राहकांसाठी खास २७९ रुपयांचा क्रिक्रेट अ‍ॅड-ऑन प्लान आणला  आहे. हा प्लान डिज्नी+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शनसह येतो. आजपासून आयपीएल सुरू होणार असून, या प्लानच्या माध्यमातून तुम्ही सामन्यांचा आनंद घेऊ शकता.  या प्लानसोबत Disney+Hotstar Mobile चे १ वर्षाचे सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच, १५ जीबी हाय-स्पीड इंटरनेट देखील मिळते. यामुळे यूजर्सला वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. परंतु, हा नवीन प्लान ठराविक यूजर्ससाठीच असून, तुम्ही MyJio मध्ये तुमच्यासाठी प्लान उपलब्ध आहे की नाही याची माहिती घेऊ शकता. या प्लानमध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळत नाही.

​जिओचा ४९९ रुपयांचा प्लान

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे Disney+ Hotstar च्या सबस्क्रिप्शनसह येणारे अनेक प्लान्स उपलब्ध आहेत. कंपनीकडे ४९९ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ५६ जीबी डेटाचा फायदा मिळतो. 

या प्लानचे वैशिष्ट्ये म्हणजे यात मोफत Disney+ Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन दिले जात आहे. सोबतच, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतील.

जिओचा ६०१ रुपयांचा प्लान

टेलिकॉम कंपनी Reliance Jio कडे ६०१ रुपये किंमतीचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात दररोज ३ जीबी डेटाचा फायदा मिळेल. अशाप्रकारे, प्लानमध्ये एकूण ८४ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये देखील तुम्हाला Disney+ Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. म्हणजेच, आयपीएल पाहण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. 

​Vodafone Idea आणि Airtel च्या प्लान्समध्येही दिसेल आयपीएल

Vodafone Idea आणि Airtel च्या प्लान्समध्ये देखील डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. Vodafone Idea च्या ६०१ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटासह डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. तर Airtel च्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटासह डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी