Jio New Recharge Plans: जिओकडून ग्राहकांकडून मोठा झटका, 'हे' प्लान होणार महाग

Jio New Recharge Plan: स्वस्त कॉल रेटसाठी प्रसिद्ध असलेल्या जिओने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. प्रीपेड प्लान्स येत्या 6 डिसेंबरपासून 40 टक्क्यांनी महाग होणार आहेत.

Jio plans
जिओकडून ग्राहकांकडून मोठा झटका, 'हे' प्लान होणार महाग  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • स्वस्त कॉल रेटसाठी प्रसिद्ध असलेल्या जिओनं आता आपलं मोबाइल टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • एअरटेल आणि व्होडाफोनंतर आता जिओनं 6 डिसेंबरपासून आपल्या प्लान्समध्ये 40 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • नवे प्लान्स 6 डिसेंबरपासून लागू होतील.

मुंबईः  स्वस्त कॉल रेटसाठी प्रसिद्ध असलेल्या जिओनं आता आपलं मोबाइल टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेल आणि व्होडाफोनंतर आता जिओनं 6 डिसेंबरपासून आपल्या प्लान्समध्ये 40 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं रविवारी एक पत्रक जारी केलं. त्या पत्रकात कंपनीनं म्हटलं की, सर्व नेटवर्कवर मोबाइल सर्व्हिस रेट्स ऑल इन वन प्लान्सच्या अंतर्गत वाढवले जातील. ज्यात ग्राहकांना 300 टक्क्यांपर्यंत फायदा मिळेल. 

जिओकडून सांगण्यात आलं की, भारतीय अर्थव्यवस्थेत परिवर्तन भूमिका टेलिकॉम आणि डिजिटल सेवांची भूमिका करत आहे. आमचं काम टेलिकॉम सेक्टर मजबूत करणं हे आहे. जिओ लवकरच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटासोबतच ऑल इन वन प्लान्स सादर करेल. नवे प्लान्स 6 डिसेंबरपासून लागू होतील. जिओनं म्हटलं की, टेलिकॉम क्षेत्रात स्थिरता राहावी यासाठी शक्यतो पाऊल उचलण्यात येईल. 

जिओने ही वाढ अशा वेळी केली आहे की, जेव्हा प्रतिस्पर्धीं एअरटेल आणि व्होडाफोन 3 डिसेंबरपासून त्यांनी त्यांच्या योजनांमध्ये 40% टक्क्यांनी वाढ जाहीर केली आहे. टेलिकॉम टॅरिफमध्ये बदल करण्यासाठी सरकारकडे सल्ला मागणार आहे, असं जिओनं म्हटलं आहे.

जिओनं ऑक्टोबर 2019 मधल्या दुसऱ्या आठवड्यात आययूसीचा संदर्भ देतं सर्व नेटवर्कवर मिळणारी फ्री कॉलिंगची सुविधा बंद केली. कंपनीनं यासाठी आययूसी चार्जचं कारण सांगून आणि आपल्या नेटवर्कवर म्हणजेच जिओ ते जिओवर फ्री  कॉलिंगची सुविधा सुरू ठेवली.  

2016 साली रिलायन्सची जिओ सेवा देभभरात लॉन्च झाली. जिओमुळे अन्य टेलिकॉम कंपन्यांना चांगलाच झटका बसला. ज्यावेळी जिओची सेवा लॉन्च झाली तेव्हा रिलायन्सनं लोकांना फ्री कॉलिंग आणि स्वस्त डेटा असं गिफ्ट दिलं होतं. कंपनीनं आपल्या कॉमर्शियल सुरूवातीचे जवळपास तीन वर्षांपर्यंत ही सुविधा कायम ठेवली. अन्य नेटवर्कवर म्हणजेच जिओकडून कोणत्याही अन्य नेटवर्कवर कॉलिंगवर 6 पैसे प्रति मिनिट असा चार्ज लागेल. टेलिकॉम कंपनीच्या या निर्णयानंतर जास्त प्रमाणात सब्सक्राइबर्संनी या निर्णयाचा विरोध केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी