७५ रूपयांत महिनाभर फ्री कॉलिंग आणि ३ जीबी डेटा, पाहा कोणती कंपनी देतेय ही ऑफर

फोना-फोनी
Updated Feb 05, 2021 | 16:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

रिलायन्स जिओेने ग्राहकांसाठी ७५ रूपयांचा स्वस्तातील प्लान आणला आहे. यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.

reliance jio
७५ रूपयांत महिनाभर फ्री कॉलिंग आणि ३ जीबी डेटा 

थोडं पण कामाचं

  • जिओच्या ऑल इन वन प्लान्समध्ये एकूण ४ रिचार्ज प्लान आहेत.
  • जिओ फोनच्या ७५ रूपयांच्या या रिचार्ज प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे.
  • एसएमएसबाबत बोलायचे झाल्यास यूजर्सला ५० एसएमएसची सुविधा मिळते. यात एकूण ३ जीबी डेटा मिळतो. 

मुंबई: गेल्या काही वर्षांध्ये डेटा पॅकच्या(data pack) किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. ग्राहकांना रिचार्ज प्लानमध्ये कोणत्याही नंबरवर फ्री कॉलिंगची(free calling) सुविधा मिळता. यासोबतच दुसरेही अन्य फायदे मिळतात. यातील वाढती स्पर्धा पाहता रिलायन्स जिओ(reliance jio), एअरटेल(airtel), व्होडाफोन-आयडिया(vodafone-idea) आणि बीएसएनएल(bsnl) या कंपन्या सातत्याने आपल्या ग्राहकांना विविध प्लान्स उपलब्ध करून देत आहे. 

रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी धमाकेदार प्लान बाजारात आणला आहे. यात ग्राहकांना महिनाभर फ्री कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. म्हणजेच ग्राहक कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. जिओचा हा प्लान ऑल इन वन प्लानचा भाग आहे. जाणून घ्या या प्लानबद्दल..

अनलिमिटेड कॉलिंगसह ३ जीबी डेटा

जिओ फोनच्या ७५ रूपयांच्या या रिचार्ज प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. जिओच्या या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. जर एसएमएसबाबत बोलायचे झाल्यास यूजर्सला ५० एसएमएसची सुविधा मिळते. यात एकूण ३ जीबी डेटा मिळतो. 

१८५ रूपयांच्या प्लान्समध्ये ५६ जीबी डेटा

जिओच्या ऑल इन वन प्लान्समध्ये एकूण ४ रिचार्ज प्लान आहेत. जिओ फोनच्या प्लानमध्ये ७५ रूपयांपासून १८५ रूपयांपर्यंते प्लान आहेत. या साऱ्या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. जिओ फोनच्या १२५ रूपयांच्या प्लानमध्ये १४ जीबी डेटासह फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तर १५५ रूपयांच्या प्लानमध्ये २८ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लानमध्ये युजर्सला दिवसाला एक जीबी डेटा मिळतो. जिओ फोनच्या १८५ रूपयांच्या प्लानमध्ये ५६ जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसची सुविधा मिळते. 

दुसऱ्या प्लानपेक्षा स्वस्त आहे जिओचा प्लान

जिओच्या इतर प्लानच्या तुलनेत हा प्लान खूप स्वस्त आहे. २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह सुरूवातीचे प्लान १२९ रूपयांचे आहेत आणि यात फ्री कॉलिंगसह २ जीबी डेटा मिळतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी