जिओकडून 'या' ऑफरच्या तारखेत वाढ, यूजर्संना होणार फायदा

Jio Phone Offer: जिओनं आपल्या फिचर फोन म्हणजेच जिओ फोनवर मिळणाऱ्या दिवाळी ऑफरची अंतिम तारीख वाढवली आहे. नव्या ऑफरच्या अंतर्गत जिओचा फोन 699 रूपयांमध्ये मिळेल. 

Jio
जिओकडून 'या' ऑफरच्या तारखेत वाढ, यूजर्संना होणार फायदा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • जिओनं आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ फोनवर मिळणाऱ्या दिवाळी ऑफर कायम ठेवली आहे.
  • जिओ फोन आता सुद्धा ग्राहकांना केवळ 699 रूपयांना मिळेल.
  • जिओनं आपल्या ग्राहकांना खास भेट देत ही ऑफर 1 महिन्यासाठी आणखी वाढवली आहे.

मुंबईः जिओनं आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ फोनवर मिळणाऱ्या दिवाळी ऑफर कायम ठेवली आहे. म्हणजेच जिओ फोन आता सुद्धा ग्राहकांना केवळ 699 रूपयांना मिळेल. जिओनं आपल्या ग्राहकांना खास भेट देत ही ऑफर 1 महिन्यासाठी आणखी वाढवली आहे. दिवाळी ऑफरच्या आधी जिओ फोनची किंमत 1500 रूपये होती. जी या ऑफरनंतर 699 रूपयांवर आली आहे. 

जिओच्या या ऑफरमुळे ग्राहकांना थेट 800 रूपयांचा फायदा मिळत आहे. इतकंच नाही तर जिओ यासोबतच 700 रूपयांचा अतिरिक्त डेटा देखील देत आहे. कंपनीचा दावा आहे की, या ऑफरमुळे गेल्या 3 आठवड्यात जिओ फोनच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. या ऑफरचा लाभ खासकरून ग्रामीण भागातल्या यूजर्संना होत आहे. जिथे बऱ्याच लोकांनी जिओ फोन खरेदी केला. 

जिओच्या दिवाळी ऑफरनंतर 4G फिचर फोनची किंमत कोणत्याही 2G फोनच्या मॉडल्सपेक्षा कमी झाली आहे. याचा फायदा काही 2G ग्राहकांनी उचलला आणि आपला फोन 4G फोनमध्ये बदलला आहे. या कारणानं ग्रामीण भागात जिओ फोनची मागणी बरीच वाढली आहे. 

जिथे 2G फिचर फोनमध्ये केवळ बोलणं आणि एसएमएस पाठवले जाऊ शकतात. तर जिओ फोन एक 4G डिव्हाइस आहे. ज्यात जिओ टीव्ही, व्हॉट्सअॅप, फेसबुक, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ म्यूझिक यासारख्या काही चांगले अॅप आहेत. वाढती मागणी बघता रिलायन्स जिओनं ही ऑफर महिन्याभरासाठी वाढवली आहे. 

कंपनी आपल्या ग्राहकांना अतिरिक्त डेटा देत आहे. ज्याचा उपयोग एंटरटेनमेंट, पेमेंट, ई-कॉमर्स, शिक्षा, ट्रेन आणि बस बुकिंगमध्ये उपयोग करू शकता. जिओचे ग्राहक 35 कोटींच्या पलीकडे पोहोचले आहेत. ज्यात जिओ फोनचे ग्राहक जवळपास 8 कोटी आहेत.

याव्यतिरिक्त Jio new Rs 222 recharge plan: जिओने या प्लॅनमध्ये फ्री जिओ टू जिओ कॉलिंग आणि २ जीबी प्रति दिन डेटा दिला आहे. याशिवाय १०० एसएमएस दररोज देण्यात आले आहेत. या प्लॅनमध्ये १००० कॉलिंग मिनिट्स हे इतर नेटवर्कवरील व्हॉईस कॉलिंगसाठी देण्यात आले आहे. जे सहा पैसे प्रति मिनिट दराने लागू केले जात होते. यासोबतच या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ अॅपचं मोफत सब्सक्रिप्शन आणि २८ दिवसांची वैधता मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी